हरी ओम
मला जळगाव येथील श्री अनिरुद्ध आनंदोत्सवात जायला
मिळाले नाही. माझे दोन्ही पायांना fracture असल्यामुळे मला ते शक्य झाले
नाही. परंतु श्री अनिरुद्ध आनंदोत्सवाच्या प्रत्येक गोष्टी फेसबुकच्या
माध्यमातून अनुभवण्यास येत होती त्यामुळे खूप खुश होतो. बापूंचे मुंबईहून
झालेले प्रस्थान ते बापू जळगाव हून निघाल्यापासून मुंबईला पुन्हा पोहचे
पर्यंत सगळ्याच गोष्टी फेसबुक वरून अनुभवण्यास मिळाल्या.
श्री
अनिरुद्ध आनंदोत्सव संपला नव्हता तर, जळगाव येथील श्रद्धावानांच्या
जीवनातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील श्रद्धावानांच्या जीवनात सुरु झाला. खर
तर बापू मिळाल्यापासूनच श्रद्धावनाच्या जीवनात आनंदोत्सव येतो. तेही
अनिरुद्ध गतीने.
१८ ऑक्टो. संध्याकाळी मला
निवाससिंह ह्यांचा मेसेज आला कि- 'बापू कामयानी expess ने येत आहेत व
कल्याणला ती ट्रेन ९.५५ला येणार आहे ज्यांना बापूंच्या स्वागतासाठी जायचं
असेल ते जाऊ शकतात. शेवटच्या डब्यात बापू आहेत '
मनात तर खूप येत
होते कि, आपल्याला जायला मिळाल असत तर किती बर झाल असत बापूंच दर्शन झाल
असत. पण ते शक्य नव्हत कारण, मला साधे उभे राहणेही शक्य नाही तर कस होऊ
शकेल? शिवाय कल्याण स्टेशन वर जिने चढ- उतरणे आलेच. आणि घरात एकटी आईच
असल्यामुळे मला कोण घेऊन जाणार तिथपर्यंत. शिवाय तिथे सर्व श्रद्धावानाची
गर्दी असणारच आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे नेहमीची गर्दी तर अजूनच असणार
मग तर हे शक्यच नाही. म्हणून मी फक्त विचार करून गप्प बसलो. आणि फेसबुक
वरील अपडेट चेक करत होतो.
संध्याकाळचे ८.१५ वाजले होते माझा फोन वाजला
आणि निवाससिंहनि मला सांगितले "९.०० वाजता तयार राहा बापूंना भेटायला जायचे आहे."
मी म्हटलं "अरे कस शक्य आहे मला येण?"
तर त्याने सांगितलं "तू काही काळजी करू नकोस सगळी arrangement झालेली आहे नाही म्हणू नकोस. "
आणि फोन ठेऊन दिला.
त्याने
सांगितल्याप्रमाणे मी ९.०० वाजता तयार राहिलो. तो आणि अजून ३ जन मला
घ्यायला आले आणि मला गाडीतून स्टेशन वर आणलं तिथे wheelchair वरून जीन्या
वर आणलं. जिन्यावर कोणत्या platform गाडी येणार हे माहित नसल्यामुळे
श्रद्धावानाची गर्दी जमलेली होती तेथेच आम्हीहि थांबलो. काही वेळाने सगळे
श्रद्धावान platform ४ वर गेले. गर्दी खूप होती म्हणून बापूंच दर्शन होईल
कि नाही ह्या विचाराने मी सांशक होतो. हा विचार करत करताच आम्हीही
platform ४ वर जायला निघालो. इतक्यात announcement झाली कि ट्रेन platform ६
वर येत आहे. त्यामुळे आम्ही सगळे जन platform ४ ऐवजी platform ६ वर धक्का
बुक्की न करता अगदी आरामात आम्हाला जायला मिळाले.
ट्रेन आल्यावर
सगळीकडे बापूंचा जय जयकार सुरु झाला. आणि बापूंच्या बोगीजवळ गर्दी झाली
आम्ही मागेच होतो. परंतु बाप्पा मला मुळीच असा सोडणार नव्हता. सगळ्याची
बाप्पाच्या दर्शनासाठी झुंबड असताना आणि एवढी गर्दी असताना मला त्या
गर्दीतून वाट काढत काढत बापुंपर्यंत नेण्यात आले. "बापूनी एक मस्त गोड
स्मितहास्य केल आणि thumbs up करून आशीर्वाद दिले इतकेच नाही तर सावकाश
काही काळजी करू नकोस मी (बापू ) आहे ना. असे खुणावले. व २ वेळा मुका
घेतला."
एरवी पायाची जास्त हालचाल झाली कि पाय दुखायला लागायचा परंतु
एवढ्या गर्दीतून जाऊन आणि पायाला २-३ वेळा धक्का लागूनही मला जराही
दुखापत झाली नाही.
मला गर्दीतून बाहेर आणण्यात आले. तेथे पूज्य समीरदादा भेटले समीर दादांनी मस्त हरी ओम केल आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले "
बिनधास्त एकदम!!!"
ट्रेन
अजूनही स्टेशन वरच थांबलेली होती. थोड्यावेळाने बापू आत गेले आणि
दरवाज्यावरील गर्दी कमी झाली. मला सगळ्यांनी पुन्हा बापू ज्या दरवाज्यात
येणार होते त्या दरवाज्यात आणले. मी बापूंची वाट बघू लागलो इतक्यात ट्रेन
सुटणार आणि बापू धावत धावतच दरवाज्यात आले आणि मला हात दाखवला व पुन्हा
२-३ वेळा मुका घेतला. बापूंनी बिनधास्त काही काळजी करू नकोस असे ट्रेन
पुढे जात असताना सांगितले.
मी फक्त इच्छा प्रकट
केली होती आणि ती त्यानेच सत्यात उतरवली आणि मला जो आनंदोत्सव अनुभवायला
मिळाला नाही म्हणून मी रडत होतो. तो त्यानेच माझ्या जीवनात घडवून आणला. मी
फक्त एक पाऊल चाललो, खरतर तेही त्यानेच चालविले आणि त्यानेच बाकीची ९९
पावले चालून मला तो भेटायला आला १०८% आणि मी ह्याची देही ह्याची डोळा
आनंदोत्सव अनुभवला.
मला भेटण्या आला बापू,
मला भेटण्या आला!!!
श्री राम!!!
श्री राम !!!
श्री राम !!!!!!!!