Wednesday, March 02, 2011
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (२४-०२-२०११)
“दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते..”
दुर्गा नाव आपण बघितले, त्यानंतर येते ती क्षमा. मनुष्य नेहमी जे जे चांगले करायचे ठरवतो ते ते नमके घडत नाही तर जे जे नाही करायचे असते तेच नेमके घडते.असे होणे म्हणजेच दुर्गती…म्हणून जी ही दुर्गती हारणारी दुर्गा ..तीच पुढे क्षमा बनून आमच्या जीवनात येऊ शकते. क्षमा म्हणजे नक्की काय ? हे आधी आपल्याला समजले पाहीजे. जे काही आतापर्यंत पाप केले ते सर्व पुसून शुन्य करणे म्हणजे क्षमा असे आपल्याला वाटते. देवाचे नाव घेतले म्हणजे आपण कितीही वाईट वागू शकतो असे काहींना वाटते. प्रत्येक जण आपापल्या परीने सोयीचा अर्थ काढत असतो. क्षमा समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला दुसऱ्यांना क्षमा करता आली पाहीजे. मनुष्य नेहमी स्वत:ला क्षमा करत असतो परंतु , दुसर्याला मात्र त्याला क्षमा करता येत नाही.
इथे एक लक्षात घेतले पाहीजे की, मला जर परमेश्वराकडून क्षमा हवी असेल तर मला प्रथम माझ्या आयुष्यातील इतर चांगल्या लोकांना त्यांच्या चुकांसाठी क्षमा करता आले पाहीजे. एखादी व्यक्ती ९९ वेळा माझ्याशी चांगली वागली असेल आणि एकदा जर वाईट वागली तर आपण ते वाईट लक्षात ठेवून त्या व्यक्तीशी लगेच बोलणे बंद करतो.
नेहमी स्वत:च्या चुकांना मनुष्य माफ करत राहतो, स्वत:च्या चुकांसाठी परिस्थितीला कारणीभूत ठरवतो. अन्यायाच्या नावाखाली छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडत असतो. इथे क्रोध तुमच्या मनातच असतो म्हणून तो व्यक्त होतो,हे मान्य करत नाही.तर त्यासाठी अनेक सबबी मात्र सांगत फिरतो.
जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात फसते तेव्हा ती लगेच दुसर्यावर त्याचा आरोप करते,आपल्या फसवणुकी साठी दुसर्याला दोषी ठरवते. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती फसते तेव्हा ती कुठल्या ना कुठल्या लोभामुळेच फसत असते हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहीजे.
माणुस म्हटले की हातून चुका घडणारच पण महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, एखाद्या चांगल्या मनुष्याच्या चुका जगभर सांगत बसू नका.
मी (प.पू.बापू) नेहमी बघतो, ८० वर्षाची स्त्री देखील ५८ वर्षापुर्वी तिचा सासूने काय अपमान केला होता ह्यावरून नवर्याशी भांडताना दिसते.नवरा पण तेव्हा पत्नीचे वडिल कसे वागले ह्यावरून तिच्याशी वाद घालतो. इथे पती-पत्नीचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी ते एकमेकांना क्षमा करत नाहीत. लग्नानंतरही “आमच्याकडचे – तुमच्याकडचे” ह्या गोष्टी संपत नसतात.विशेषत:स्त्रिया स्वत: सासू होईपर्यंत सासरच्या आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली असेल तरी ती किती काळ उगाळत बसायची?असे करत बसल्याने त्यात प्रेमाचे नाते उरतच नाही. लक्षात ठेवा ज्या प्रमाणात मनुष्य दुसर्यांना क्षमा करायला विसरतो त्या प्रमाणात त्याचा प्रवास कलीयुगाकडे होत असतो.
जे लोक मुळातच वाईट आहेत अश्यांबद्द् ल मी इथे बोलत नाही, पण ज्या आपल्या प्रेमाच्या
व्यक्ती आहेत त्यांच्यांवर तरी चिडू नका. एखाद्या वेळी केलेली मस्करी वेगळी..पण जर तीच मस्करी परत परत घडली तर ती मस्करी उरत नाही, त्याची जागा क्रोध घेतो आणि मग तुम्ही हा राग बाहेर व्यक्त करायला निमित्त शोधत राह्ता.
पती-पत्नी जेव्ह्ढे एकमेकांना ओळखतात तेव्हढे दुसरे कोणीही ओळखु शकत नाही.जेव्ह्ढं आई आणि मुलाचे नाते पवित्र असते तेव्हढेच पती-पत्नीचेही नाते पवित्र असते.पतीच्या नुसत्या हालचाली वरुन देखील पत्नी त्याच्या मनातील भाव ओळखु शकते.तसेच आई-वडील देखील मुलांच्या हालचाली वरुन त्यांच्या मनात काय चालू असेल ते ओळखू शकतात. हे ज्ञान कशातून होते ? फक्त प्रेमातूनच…म्हणून क्षमा सुद्धा प्रेमातूनच येत असते.
जर पती- पत्नीचे एकमेकांवर प्रेम असेल आणि तरी एकमेकांच्या चुका काढत असतील तर खरच ते थांबवा. आज सर्व पुरुषांना मुद्दामहून एक सांगावेसे वाटते..”If you want to understand your wife you have to love her and once you love her then there ‘No Need left’ to Understand her !!! “
खरंच हे वाक्य जराही चूक नाही…कारण सगळ्या स्त्रियांकडे एकच rational असते ते म्हणजे हा माझा नवरा आहे..बस्स..बाकी काही नाही. स्त्री इतर सर्व आप्तांशी वागताना सुसंगत वागेल पण नवर्याशी मात्र नाही, कारण एकच भावना की, हा माझा आहे.
इथे असं म्हणायचे नाही की नवर्याने पत्नीच्या मुठीत राहायचे. पुरुषाने नेहमी कर्ता, खंबीर असलेच पाहीजे. कारण ज्या घरातील स्त्री dominating असते, नवर्यावर ओरडत असते, त्या घरात मुलगे भित्रट तर मुली चालू बनतात.व ज्या घरातील पुरुष व्यसने करतो, पत्नीवर ओरडत राहतो त्या घरातील मुलगे बेछूट वागणारे तर मुली भित्रट बनतात. म्हणूनच आज इथे सांगावेसे वाटते की, जर नवरा-बायकोला भांडायचेच असेल ना तर खरंच मुलांसमोर कधीच भांडू नका..कारण लहान मुलांना क्षमा करता येत नाही.
लहान मुले जे काही डॊळ्यांनी बघतात (घरातील मोठ्या व्यक्तींचे वागणे) ते ते सर्व आपल्या मनात तसंच्या तसे लिहून ठेवतात.त्यामुळे पुढे मोठेपणी ते पण तसेच वागतात. जर स्त्रीला वाटत असेल की आपल्या सुनेने, मुलाने आपल्याशी नीट वागावे तर आधी तिला आपल्या सासुशी नीट वागता आले पाहीजे, ती जसे वागणार ते बघुन तिचा मुलगाही तिच्याशी तसेच वागणार, हे लक्षात ठेवले पाहीजे, कारण मुलांकडे क्षमा हा गुण नाही.
क्षमा हा फक्त परमेश्वराचाच गुणधर्म आहे, तो माणसाकडे उपजत नसतो, माणसाला हा गुण आत्मसात करावा लागतो. सत्त्व गुणाशिवाय क्षमा येत नाही, व क्षमेशिवाय सत्त्व गुण येत नाही. सत्त्व गुण हा भाव शारिरी गुणांपेक्षा वरचढ असणारा व दु:खांना दुर करणारा असतो.हा सत्त्व गुण येत असतो तो फक्त पवित्र आचरणातून, पवित्र आहार-विहारातुन म्हणजेच परमेश्वराचे गुणसंकीर्तनामधुन, तसेच इतरांच्या केलेल्या सेवेतुन.. जेव्हा आपल्याकडुन दुसर्यांना (आप्तांना) क्षमा केली जाते तेव्हा त्या क्षमेमधुन आपल्याला १० ग्रॅम क्षमा, १० ग्रॅम सुख, १० ग्रॅम दु:खाची निव्रूत्ती,१० ग्रॅम सत्त्व गुण प्राप्त होत असतो .
क्षमा कोणाला करायची हे आम्हांला नीट कळले पाहीजे. क्षमा सुद्धा एक प्रकारचे दानच आहे .ते सत्पात्रीच व्हायला हवे..म्हणून आपल्या आप्तांना क्षमा करायला शिका. आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना तुम्ही क्षमा करायला शिकलात की, ही चंडिका तुमच्या जीवनाची दुर्गती दुर करते…आणि तीच क्षमा असते हे लक्षात घ्या.
मनुष्य क्षमा कशी शिकतो हे बघणे पण खुप सुंदर आहे. लहान बालक पहिल्यांदा क्षमा करते ते आपल्या आईला..आपले बाळ एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर आई त्याला फटके मारते..हे फटके म्हणजे त्या बाळासाठी टॉनिकच असते.कारण त्यामुळे बाळ चुकिच्या गोष्टींपासुन दुर होते. .ह्या ठिकाणी जरी आई फटके देत असली तरीही ते बाळ काही वेळाने जाऊन आईलाच बिलगते.ते तिच्यावर रागवत नाही..इथे हे बाळ पहिल्यांदा क्षमा करायला शिकते.म्हणुनच क्षमा ही फक्त प्रेमातुनच येत असते. असेच परमेश्वराकडेही मला ती माझी आई आहे ह्याच भावाने बघता आले पाहीजे. परंतु मनुष्य परमेश्वराला कधीच क्षमा करत नाही. सगळे चांगले घडत असताना एखादी वाईट गोष्ट घडली तर लगेच त्यासाठी परमेश्वराला दोष दिला जातो.जेव्हा एखादी हवी असलेली गोष्ट मिळत नाही अश्या वेळी परमेश्वराकडे ती आई आहे व ती जे हिताचे असेल तेच देणार ह्या लहान बाळाच्या भुमिकेतूनच आपल्याला बघता आले पाहीजे.इथे माझ्या (प.पू.बापू) माईचे एक उदाहरण सांगावेसे वाटते, एकदा घरात काही कार्य असल्याने बरीच मंडळी होती. माई नेहमीप्रमाणे देवाची एक जपमाळ पुर्ण करुन उठली, तेव्हा तिथे काही खेळ्णी पडली होती,त्यामुळे तिच्या पायाला ठेच लागली. तेव्हा तिथे जमलेल्या काही स्त्रियांपैकी एक जण म्हणाली, “एवढी देवाची माळ करुन पण पायाला ठेच लागली, काय उपयोग झाला देवाचे नाव घेवून ?”त्यावर माईने उत्तर दिले, “माळ केली होती,म्हणुन ठेचेवर तरी निभावले नाहीतर फ्र्यक्चरच झाले असते”माईचे हे शब्द ,हा भाव कधीच विसरू नका.असा जेव्हा तुमचा भाव असेल तेव्हा तुमच्या मार्गावर माझी (प.पू.बापू) आई ही दुर्गती हा्रिणीच असेल. ह्याच्या पुढे नाव आहे ते शिवा म्हणजे परम पवित्रता देणारी, परम कल्याण करणारी.नंतर येते ती धात्री…धारण करणारी, आधार देणारी. मग नाव येते स्वाहा..आहुती देणारी, परमेश्वराला अर्पण करणारी.आणि नंतर नाव आहे ते स्वधा..पितरांचे श्राध्द करताना स्वधा काराचे खुप महत्त्व आहे.जे देवांचे पुजन करताना स्वाहा काराचे महत्त्व तेच स्वधा काराचे महत्त्व आहे. तुमचा आत्ताचा जन्म व तुमचे आधीचे सर्व जन्म ह्यांना भक्ती पुरविण्याचे काम स्वधा करते.आम्हांला स्वधा काराचा अर्थ नीट कळला तर आम्हांला ह्या जन्मासोबत आमच्या आधीच्या जन्माचेही पाप नाहिसे करता येते.स्वाहा ही आधीच्या जन्माचे पुण्य वर्धन करते तर स्वधा आधीच्या जन्मांचे पाप हरण करते. आज कळेल आपल्याला की हा गजर किती महत्त्वाचा आहे.ह्या गजरात तुमच्या ह्या जन्मा बरोबर तुमच्या आधीच्या जन्मांपर्यंत जाण्याची ताकत आहे.जसा गुरुमंत्र तुमचा सांभाळ करणार तसाच हा गजरही करणार आहे. हा गजर प्रत्येकाच्या अंतरंगात उतरला पाहीजे. कंटाळा आला असेल तर हा गजर नुसताच करा.. सी.डी. न लावता सुद्धा हा गजर करुन बघा…समोर चंडिका आई उभी आहे…असं दृश्य समोर आणा..त्यापुढे आपले बापू, नंदाई आणि सुचितमामा बसले आहेत..बस्स बाकी काही नाही…गजर करताना बेधुंद व्हा, तल्लीन व्हा, बेभान व्हा.जसा एक भोळा वारकरी होतो अगदी तसेच मला इथे प्रत्येकजण आईच्या गजरात तल्लीन झालेला हवा आहे.सगळी दुखणी विसरून जा..मनापासुन गजर करा, अतिशय प्रेमाने.हरि ॐ
** प्रवचनानंतर बापुंनी सांगितले की, उत्सवापर्यंत “जयन्ति मंगला काली..” हा गजर दर गुरुवारी १५ मिनिटे श्री हरी गुरु ग्राम येथे लावला जाणार आहे व प्रत्येकाने ह्या गजरात आनंदाने सामील व्हायचे आहे. प्रवचनानंतर हा गजर झाल्यावर प.पू.बापूंनी सांगितले की, गजराच्या वेळी “आई”साक्षात येथे उभी होती.आज उत्सवाचे तिला आमंत्रण दिले होते, ते आमंत्रण स्विकारायला ती प्रत्यक्ष इथे आली. आज आली म्हणजे उत्सवाला देखिल येणारच…ॐ नमश्चण्डिकायें.

Saturday, January 15, 2011
श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती - काही महत्वाचे मुद्दे
हरी ॐ!
श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती संदर्भातील काही शंकांचे निरसन परम पूज्य बापूंनी ६ जानेवारी रोजी प्रवचनात केले होते. १३ जानेवारी रोजी झालेल्या प्रवचनाच्या आधी देखील परम पूज्य बापूंनी श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती संदर्भात काही प्रश्नांचे निरसन केले.
हरी ॐ
आज परत काही प्रश्न बघायचे आहेत.
१) उडदाची डाळ चिकट असते तर सांबर कसे करायचे? नारळ सुका घालयचा की ओला?
-- खर सांगायचे झाले तर उडदाची आमटी हा नवरात्रातला common पदार्थ आहे. सांबर म्हणजे ज्यात विविध भाज्या घातल्या आहेत अशी तिखट आंबट गोड आमटी. ह्यात नारळ सुका आणि ओला दोन्ही चालेल.
उडदाच्या सांबराची एक रेसिपी परम पूज्य नंदाआईने सांगितली आहे.
रेसिपी : उडदाची डाळ पातेल्यात तेलात परतायची आणि लालसर झाली की पाणी घालायचे, ह्यामुळे चिकट पणा येत नाही. डाळ शिजवून पाणी उरले पाहिजे. (कुकरच्या ३ शिट्या करायच्या) ह्यात जे पाणी उरते ते नंतर आमटीसाठी वापरायचे.
उडदाची आमटी ही माझी (परम पूज्य बापू) सगळ्यात आवडती आमटी आहे. अतिशय चविष्ट पदार्थ आहे. उडीद म्हणजे उष्ण स्निग्ध, गुरु पदार्थ ,मनाला बुद्धीला ताजेतवाने व शांत करणारा पदार्थ. प्रत्येक अवयवाला पुष्टी देणारा असा हा उडीद म्हणूनच सगळ्यात पावन पदार्थ आहे.
ह्या उडदाच्या सांबारात कुठलाही सांबर मसाला घातला तरी चालेल. कांदा-लसूण वापरू शकता. हे सांबर पोळी, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता.(सर्व प्रकारच्या) इडली डोश्यासोबत खाल्ले तरी चालेल. जास्त करून तांदूळ, गव्हाचा वापर करा. हे खाल्यावर कळेल की पोटाला किती फ्रेश वाटते!! ह्यातील सगळे पदार्थ हे सम्यक उर्जा निर्माण करणारे आहेत.
प्रपत्ती करताना दुसर्यांच्या चुका काढत बसू नका. जी basic माहिती आहे त्यानुसार जल्लोषाने व समाधानाने प्रपत्ती साजरी करा.जर प्रपत्ती करताना काही चूक झालीच त्यासाठी तुमची आई समर्थ आहे.
हळद - कुंकू ह्यांचे विसर्जन करायचे.
तांदूळ- गहू प्रत्येकीने वाटून घ्यायचे व घरी घेवून जायचे. एक दाणा मिळाला की शंभर दाणे सारं तेवढंच महत्वाचं.
आता
ॐ मन्त्राय नमः
आपण बघत होतो सर्व बाधा प्रशमनम. ह्या आधी आपण वैखरी देवी व श्री गुरुकेंद्र बघितले. आज बंधन बाधा बघायची आहे .बंधन म्हणजे क्रियेला, गतीला अटकाव. जे करायचे आहे ते करायला न मिळणे म्हणजे बंधन.
घरी उशिरा न येणे, खोटे न बोलणे ही negative वाटत असली तरी चांगली बंधने आहेत.
बंधन बाधा ही दोन प्रकारची आहे -
१) स्व- कृत २) पर- कृत
तुमच्या प्रगतीच्या आड तुम्ही स्वतः येता म्हणजेच आपल्या दुर्गुणांमुळे जे काही आपण करून बसतो ते स्व-कृत बंधन. ही बाधा प्रयत्न्यपूर्वक दूर करावी लागते आणि यासाठी गुरूक्षेत्रम मंत्रच धावून येणार .
२) पर-कृत बंधन बाधा ह्याचे दोन प्रकार आहेत.
१) भौतिक - तुम्हाला चुकीचा सल्ला मिळणे, मुलगा-आईमध्ये, नवरा-बायकोत भांडण उत्पन्न होणे ही भौतिक बाधा आहे. याचबरोबर आपला सहकारी किवा शेजारी निंदा करतो तेव्हा देखिल भौतिक बाधा बंधन उत्पन्न होते.
२) अ-भौतिक - अ-भौतिक म्हटले की पहिल्यांदा जारण-मारण असेच विचार मनात येतात. ह्या गोष्टीच्या विचारात पण कधी अडकू नका. अश्या गोष्टींचे bacteria (विषाणू) कुठले ह्याच्याशी आपला संबंध नाही. आपल्याला हे bacteria कसे शरीरात घुसतात व त्यावर लस कोणती हे बघायचे आहे .
जेव्हा परीक्षेला एखादी कविता यायची असेल तर आपण ती सतत वाचतो, गुण गुणतो. पण परीक्षा झाल्यावर ती कविता आठवतही नाही. पण तेव्हा महिनाभर न ऐकलेले पिक्चरचे गाणे मात्र आपोआप आठवते. असे stop आणि start चे बटन हीच मनाची ताकद. आजचा प्रत्यक्षचा अग्रलेख ह्या वरच होता श्रेयस आणि प्रेयस. तुमच्या मनाला कायम प्रेयसाची ओढ तर बुद्धीला श्रेयसची ओढ असते.
आपली बुद्धीचे काम कुठपर्यंत ते मन ठरवते, काम झाले की मन आवडीच्या गोष्टींकडे वळत असते. बुद्धी कधी भ्रष्ट होत नाही मन भ्रष्ट होत असते. मनाच्याच साहाय्याने बंधनात अडकायला होते तर मनाच्याच साहाय्याने बंधनांतून बाहेर पडता येते.
मनाचे भाग ३ आहेत -
१) जागृत- बाह्य मन (conscious mind )
२) अजागृत - आंतर मन (sub conscious mind )
३) संक्षिप्त मन (interceptive mind )
बाह्य मन हे ज्ञानेन्द्रीयांशी जोडलेले पूर्ण पणे स्वतंत्र असते. तर आंतर मन हे आंधळे असते. हे केवळ बाह्य मनाच्या सहाय्यानेच बघू शकते . तरीही हे सगळ्यात सशक्त आहे कारण हे फार व्यापक आहे. म्हणूनच आंतर मन सगळ्यात प्रभावी ठरते. ह्या मनाला feed back बाह्य मनाकडून मिळत असतो. तर संक्षिप्त मन हे आंधळे असते व पांगळेही. जागृत व अजागृत मन ह्यांच्यामधला एक अतिशय सुंदर common point म्हणजे संक्षिप्त मन.
ज्यांची तुमचे वाईट व्हावे अशी इच्छा असते ती मंडळी तुमच्या कडची दैवी उपासना खंडित करण्यासाठी तुमच्या वैखरी देवीचे केंद्र व तुमचे श्रीगुरु केंद्र ह्या दोन केंद्रांचा तुमच्या संक्षिप्त मनाशी असणारा संबंध तोडण्यासाठी प्रयत्नशील असतात.
सदगुरू हा तुमच्या संक्षिप्त मनाचा रखवाला असतो. तुमच्या संक्षिप्त मनाचा राखणदार हेच सद्गुरूंचे प्रमुख कार्य असते.
जेव्हा तुम्ही सद्गुरुंपासून दूर जाता तेव्हा तुमचे संक्षिप्त मन कुठल्याही हल्ल्याला बळी पडु शकते. मग दुर्बळ संक्षिप्त मन चुकीच्या गोष्ठी स्विकारते. तुम्ही तुमचीच ताकद विसरून जाता, हीच बंधन बाधा .
म्हणूनच आमचे संक्षिप्त मन हे सदगुरूद्वारीचा श्वान झाले पाहिजे. कुत्रा हा नेहमी त्याच्या मालकाशी प्रमाणिक असतो, उपाशी असेल तरी तो त्याच्या मालकाने दिलेलेच अन्न खातो. आम्ही कितीही चुकलो तरी आमचे संक्षिप्त मन आम्हाला सद्गुरुंच्या ताब्यात देता आले पाहिजे. सद्गुरु त्यावर कसे कार्य करतात हे मी इथे सांगणार नाही.
आमचे सक्षिप्त मन सद्गुरुंच्या ताब्यात देण्यासाठी काय करावे लागते तर वावर, वापर अणि सवांद .
१) वावर म्हणजे जिथे जिथे मी जातो तिथे तिथे प्रथम सद्गुरु स्मरण मला करता आले पाहिजे .
२) वापर म्हणजे जी गोष्ट आम्ही वापरतो, कुठलीही नविन गोष्ट विकत आणली की प्रथम सद्गुरूस अर्पण करून मग ती वापरावी .
३) परंतु यात नवीन लग्न झालेल्यांनी आपली पत्नी अर्पण करतो असे म्हणण्याचे चाळे करू नका. तर सद्गुरुराया तुझ्या कृपेने मला चांगला/चांगली जोडीदार लाभला/लाभली हा भाव असावा.
३) संवाद - मला माझ्या सद्गुरुंशी कायम संवाद साधता आला पहिजे. मनात राग आला तर सद्गुरुंशी बोलू लागा. आपोआप क्रोध शांत होईल. व्यवहाराच्यावेळी सद्गुरुंचे स्मरण केले तर कधीच फसगत होणार नाही.
आमच्या वावर, वापर व संवादात सद्गुरु नाम आले की आपोआप संक्षिप्त मन समर्थ होणारच.
मन बुद्धि व शरीर ह्यांचे कार्य ह्या वावर, वापर, संवादामधुनच बनते म्हणुनच तुमचा वावर, वापर व संवाद नेहमी श्री गुरुंच्या ताब्यात असू दे, मग तुमच्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही .

Subscribe to:
Posts (Atom)