गेले दीड महिना जे काही रोपे सातारा उपासना केंद्रात तयार करण्यात आली, त्यामधील शेवटचा लोट ज्यामध्ये झेंडू, घाणेरी(टन-टनी),बाभूळ,सुबाभूळ,ग ावटी-गुलाब,धुरांडी,शेवगा याप्रकारची ७४०० रोपे घेऊन सकाळी ८.३० ला श्रीगोविद्यापीठंम येथे पोहचलो. गेटचा जवळ जाता क्षणी कळल कि आज बापू,आई,दादा आले आहेत.तेह्वा मनात सर्वांनी एकच ठरवलं कि आजचा दिवस बाप्पा सोबत लुटून घ्यायचा. सकाळी रेपोर्टिंग करून सर्वांनी नाश्ता करून घेतला. त्यानंतर विजयमंत्र घेऊन सेवेला सुरुवात केली...सर्व रोपे ट्रकमध्ये असल्याने ट्रक आत आणायचे चालू होते पण मागील गेट समोर काही गाड्या असल्याने आह्मी ट्रक आत येण्याची वाट सर्व जन एकाच जागी उभे होतो...
तेवढ्यात बापू,आई, दादा रूम मधून बाहेर आले...आई पुढे होती त्यामुळे सर्वांनी आईला हरि ओम म्हणाले....आई पण आह्माला हरि ओम म्हणाली,आईसोबत बोलत असताना मागून बापू ही आले...मग आमचा मोर्चा बापूकडे आला...सर्व जन बापूना हरि ओम म्हणाले...बापूनी नेहमीप्रमाणे गोड हसून हरि ओम म्हणाले..... आजपर्यंत बापूंशी फक्त हरि ओम म्हणून दर्शन घेणे एवढच होत-होते पण त्या दिवशी पहिल्यांदा बापू सर्वांशी बोलायला थांबले मी आणि अजून दोघे पुढे असल्याने बापूं आमचा नजरेत-नजर घालून बोलत होते....आणि म्हणाले " बाळानो शेतकरी आत्महत्या करतायत, आपले सरकार त्यांना काहीही मदत पुरवत नाहीये, त्यांना कोणतीही मदत मिळत नाहीये, तर इथे शिकून गावातील प्रत्येक घरी जावा, त्यांना मदत करा..."
एवढ बोलले न पुढे निघाले तेवढ्या आह्मी म्हणालो" बापू साताऱ्याला कधी येणार..त्यावर बापू म्हणले "हो, येणार.. नक्की येणार...लवकरच येणार आहे..." मग आई ला आह्मी म्हणालो आई तू पण ये...मग आई पण म्हणली.."हो..मी पण येणार आहे साताऱ्याला..."..
मग आह्मी सेवेला जोमाने सुरुवात केली...मग रोपांचे शिफ्टिंग सुरु झाले...सर्व शिफ्टिंग झाल्यावर, दुपारी आम्ही जेवण केले.मग आह्मी संध्याकाळी आरतीसाठी द्वारकामाईत गेलो.
७.३० आरती झाली न आह्मी दर्शन घेऊन निघालेलो..जाता जाता बापूंचे पण दर्शन करून जाऊ असे ठरवून आह्मी बापूंचा रूमचा इथे गेलो...आणि बघतो तर काय..बापू,आई,दादा आणि सर्व जन तिथे बसलेले होते..न कोणी तरी बापूंचे पाय चेपण होते...आह्माला वाटल बापू काही आता उठणार नाहीत...लांबूनच दर्शन घेऊन जाव लागणार...तेवढ्यात आईची नजर अम्चावर पडली आणि आईने हरि ओम म्हणत हात केला तेह्वाच आई ला आह्मी सर्वांनी वाढदिवसाचा in advance शुभेच्छा दिल्या ...नंतर लगेच बापूनी ही खुर्ची मागे फिरवून आह्माला हाथ केला...आह्मी परत बापुना म्हणालो "बापू लवकर या साताऱ्याला,आह्मी वाट बघतोय तुमची."...
त्यावर बापू म्हणाले "yes,नक्की येणार असे म्हणत thumb up केला आणि....नीट जा,मज्जा करत जा असे म्हणून एक गोड असा flying kiss दिला.."
तोच गोड flying kiss घेऊन आह्मी बापू आई दादांचा निरोप घेतला व परत घरी यायला निघालो...
हाच होता माझा आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस..
|| हरि ॐ ||
by Sudhirsinh Waidande
No comments:
Post a Comment