मला बापूंकडे आणलं ते माझ्या बाबांनीच. माझ घर हे केळवेरोड येथे आहे आणि माझ प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिथेच बापूंच्या कृपेने पूर्ण झालं. मला आजही आठवतंय मी तेव्हा आठवीत होतो एक दिवस म्हणजे तो दिवस गुरुवारच होता बाबांना घरी यायला उशीर झाला होता रात्रीची शेवटची गाडी पकडून ते घरी १.०० वाजता आले. माझी शाळा सकाळी ७.२० ची असायची म्हणून मी लवकर झोपलो होतो. पण सकाळी जेव्हा उठलो तेव्हा बाबांनी बापूंचे चार छोटे फोटो आणले होते. ते आम्हा प्रत्येक घरातील व्यक्तीला दिले म्हणजेच माझ्या भावाला, मला आणि आईला व एक स्वतःकडे ठेवला. मला प्रथम दर्शन बापूंच तेव्हाच झाल बाबांनी आणलेल्या त्या फोटोच्या रुपात. बाबा आईला सगळ काही सांगत होते कि त्यांना गुरुवारच्या बापूंच्या प्रवचनाला जाऊन तिथे कस वाटल ते सगळ काही सांगत होते मी ते ऐकत होतो पण मला त्यातलं काहीही कळत नव्हत पण ते ऐकताना मला काहीतरी एक वेगळीच मजा येत होती आणि एक वेगळंच कुतूहल मनात निर्माण झाल कि कोण हे बापू आणि हे काय आहेत? काहीही कळत नव्हत.
त्या दिवसापासून माझे बाबा ज्या गुरुवारी वेळ मिळेल त्या गुरुवारी बापूंच्या प्रवचनाला येऊ लागले. बाबा स्टारवृत्त हा पेपर घेऊन येत असत आणि तो आम्हाला वाचायला देत असत. त्यानंतर बघता बघता २ वर्ष अशीच निघून गेली. माझ दहावीच वर्ष होत आणि परीक्षेला काही दिवसच उरलेले होते. आणि मला बाबांनी परीक्षेच्या आदल्या आठवड्यात प्रवचनाला घेऊन आले आणि बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन आलेत. मला तेव्हाही एवढ काही कळत नव्हत. मला फक्त एवढाच आठवतंय कि बापूनी त्या दिवशी प्रवचनात काही गोष्ट सांगत असताना आकाशातील तारे व ग्रहांचा उल्लेख केलं होता. मीही थोडा चंचल मनाचा होतो आणि हॉल मध्ये बसल्यामुळे मला बापूही दिसत नव्हते आणि पहिल्यांदाच एवढा वेळ स्तब्ध बसून राहायला मला जमत नव्हत. माझ प्रवचनाकडे लक्षही नव्हत. प्रवचन संपल्यावर सगळे जन दर्शन घेऊन निघत होते तसच मीही माझ्या बाबांबरोबर दर्शन घेण्यासाठी गेलो व पेपर व्यवस्थित जाऊदे अस सांगितलं. आणि तेथून निघालो. परीक्षेच्या पहिल्या दिवसाच्या आधीही गुरुवार होता. बाबांनी मला परीक्षेच्या दिवशी पेपर सुरु होण्याच्या आधी बाप्पाच एक मस्त उदिच पेन आणून दिल व ह्यानेच पेपर लिह अस सांगितलं. मग काय मला परीक्षेची भीतीच उरली नाही.
जसे चिडीच्या पायासी दोर
बांधुनी आणिती तिजला समोर
तसेच मज तू ओढले खरोखर
तुला काळजी माझी हे मी उमगलो ||
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ||

परीक्षा संपली आणि शेवटी निकालाची वेळ आली निकाल लागला बापूंच्या कृपेने मला बापूनी ७८.२६ % मार्क्स मिळवून दिले. मला इंजिनीरिंग च्या पदविका(डिप्लोमाला ) प्रवेश घ्यायचा होता आणि तो ही यंत्रअभियांत्रिकी ( Mechanical Engineering) शाखेतच हवा होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मला खाजगी कॉलेजला प्रवेश घेणे परवडणारे नव्हते. आणि त्या मानाने माझा शासकीय कॉलेजात प्रवेश मिळणे कठीण वाटत होत. मी ३ ठिकाणी फॉर्म भरले होते वसई येथील वर्तक पॉलीटेक्निक, भागुभाई पॉलीटेक्निक आणि शासकीय तंत्रनिकेतन मुंबई (बांद्रा ). वर्तक पॉलीटेक्निक येथे माझा मेरीट वर नंबर आला पण हे खाजगी असल्यामुळे तिथली फी माझ्या बाबांना परवडणारी नव्हती. नंतर भागुभाई येथे मी प्रवेशासाठी गेलो तेथेही माझा नंबर आला परंतु तेथे ५०% जागा ह्या गुजराती समाजासाठी राखीव असल्यामुळे माझी Mechanical Engineering ची जागा गेली व मला नाईलाजास्तव Civil Engineering ला प्रवेश घ्यायला लागला तेही खाजगी कॉलेजच होत परंतु Government approved असल्यामुळे मला फक्त ८००० रुपये फी भरावी लागली आणि मी तेथे प्रवेश घेतला. त्यानंतर सगळ्यात शेवटी प्रवेश प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन येथे होती. शेवटचा प्रयत्न म्हणून Mechanical Engineering ची जागा मिळते कि नाही हे बघण्यासाठी मी तिथे गेलो. त्यादिवशी मी व माझे बाबा सकाळी लवकरच मेरीट नुसार नंबर येणार होता म्हणून घरून ७.०० वाजताच निघालो होतो. तिथे गेल्यावर अस कळलं कि ज्यांच्याकडे Cast Certificate असेल त्यांना फक्त २०० रुपयेच फी भरावी लागणार आहे. माझ्याकडे OBC च certificate होत. तेही बापूंनीच मिळवून दिल होत, हिंदू-मराठा होतो परंतु शेतकरी कुटुंब असल्याने कुणबी वर्गात मोडत असल्याने आम्हाला OBC च certificate मिळाल होत. त्यामुळे मला फक्त २०० रुपये फी भरावी लागणार होती. मला आजही आठवतंय माझ संध्याकाळी ७.०० ते ७.१५ च्या दरम्यान अडमिशन मिळाल तेही शेवटचीच जागा राहिली होती Mechanical Engineering ची ती मला बापुनीच मिळवून दिली. आणि वर मला जे मी भागुभाई कॉलेजला पैसे भरले होते तेही पैसे पूर्णच्या पूर्ण परत मिळाले. ज्या ठिकाणी मला २५००० ते ३०००० रुपये फी भरावी लागणार होती त्या ठिकाणी मला अवघी २०० रुपयेच फी भरावी लागली. आणि हे फक्त तो सदगुरूच करू शकतो बाकी कोणीही नाही. हेच त्याच अकारण कारुण्य.
प्रवेश तर झाला पण पुढे मला रोज केळवे ते बांद्रा असा up-down करणं सहज जमणार नव्हत म्हणून वसतिगृहात देखील अडमिशन घेतलं. ज्या कॉलेजला प्रवेश मिळाला ते कॉलेज म्हणजे Government Polytechnic Mumbai आणि तेही बांद्रा येथेच आहे व होस्टेल देखील कॉलेजच्या आवारातच आहे. आणि हे कॉलेज श्रीहरीगुरुग्राम पासून चालत अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.
त्यानंतर ३ ऑगस्ट २००४ रोजी माझं कॉलेज सुरु झालं आणि मी होस्टेलला पण राहायला आलो आणि काही दिवसातच श्रीहरीगुरुग्राम कुठे आहे हे शोधून काढलं आणि लगेचच्या गुरुवारपासून मी नियमित प्रवचनाला येऊ लागलो. आणि बापूंच्या चरणी स्थिर झालो.जसे चिडीच्या पायासी दोर
बांधुनी आणिती तिजला समोर
तसेच मज तू ओढले खरोखर
तुला काळजी माझी हे मी उमगलो ||
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ||
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ||
|| श्री राम ||

No comments:
Post a Comment