Monday, June 13, 2011

अनिरुद्ध पथक

हरी ओम,
मित्रांनो,

अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
अशी कमांड देऊन परेडला सुरुवात झाली आणि एक एक करत सगळे स्कॉड येऊन आपल्या लाडक्या सदगुरुरायला सलामी देत आहेत. आणि एवढ्यातच आवाज येतो "आणि आता येत आहे रेस्क्यू स्कॉड ह्याचे नेतृत्व करत आहेत ......." आणि लगेच  "अनिरुद्ध पथक, रेस्क्यू स्कॉड, दहिने देख" अशी कमांड देऊन स्कॉड बापूंना सलामी देत आहे.
संपूर्ण परेडचा दिमाख हा और असतोच, त्यातही रेस्क्यू स्कॉडचा दिमाख हा बघण्यासारखा असतो. अश्या ह्या रेस्क्यू स्कॉड मध्ये सामील व्हायला कोणाला आवडणार नाही.
रेस्क्यू स्कॉड मध्ये सामील जर व्हायचं असेल तर तुम्हाला परेड डी.एम.व्ही. असणं आवश्यक आहेच. परंतु नियमित पणे रेस्क्यू प्रक्टिस चालते तिथेही तुम्हाला येण आवश्यक आहे.
रेस्क्यू प्रक्टिस मध्ये AADM च्या बेसिक कोर्स मध्ये घेतल्या जाणाऱ्या गाठींचे प्रकार, बंडेजेस चे प्रकार  इत्यादी तर घेतले जातातच. तसेच, नव नवीन रेस्क्यू करण्याच्या पद्धती ही शिकवल्या जातात. बापूंनी रामराज्याच्या प्रवचनात खेळण्याला प्राधान्य दिले आहे. तर असे हे मैदानी खेळ जसे खो-खो, पकडापकडी इत्यादी खेळ खेळण्यासाठीही इथे प्राधान्य दिले जाते. आणि अजूनही बरच काही. काय, मग अनुभवायची आहे का तुम्हा सर्वाना ही धम्माल?
तर मग, दर सोमवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता श्री हरीगुरुग्रामच्या मैदानात हे सर्व तुम्हाला अनुभवता येणार आहे. अट फक्त एकच, तुम्ही परेड डी.एम.व्ही. असणं आवश्यक आहे.
श्री राम

Saturday, June 11, 2011

श्रद्धावान आणि योगायोग

हरी ओम

Disaster Management Plan (Fire Fighting) ही सेवा AADM तर्फे आपल्या संस्थेतील कार्यक्रमामध्ये व उत्सवामध्ये चालवली जाते. जे काही आपल्या फायर फायटिंगचा कोर्स ज्या DMV नी केलेला आहे ते DMV ही सेवा करू शकतात. ही सेवा आपल्या कार्यक्रमात काही दुर्घटना घडू नये किंवा जरी झाली तरी ती वेळीच रोखता यावी म्हणून AADM तर्फे राबवली जाते.
श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सव मध्येही संस्थेने फायर फायटर ठेवले होते. ह्या उत्सवासाठी सुमारे ७० fire extinguisher आणण्यात आले होते. ह्यातले ४ extinguisher  हे buoy म्हणजेच ५० किलोग्राम वजनाचे होते. परंतु मागवताना ते ४ extinguisher water type चे मागवले होते परंतु काही कारणास्तव आपल्याकडे येताना ते २ water type आणि २ foam type . हा फोम फक्त आपण तेल असणाऱ्या ठिकाणीच वापरू शकतो अन्य ठिकाणी वापरू शकत नाही म्हणून आपण ते कमी मागवले होते. आणि तेल फक्त २ ठिकाणी होते ते म्हणजे प्रसादालय आणि महलक्ष्मि दीप.

उत्सव सुरु होऊन 3 दिवस झाले आणि सगळ काही व्यवस्थित चालू होत. महालक्ष्मी दीप च्या ठिकाणी सगळे श्रद्धावान जे सुर्स्नेहन द्रव्य अर्पण करत होते ते आपण recycle न करता तिथेच जाळलं जाव अस सामिरादादानी सांगितलं. आणि तिथे दीपोत्सव करायला सांगितला. दिवसा फायर फायटिंग व्यवस्थित चालू होती परंतु रात्रीच काय करायचं? हा एकचं प्रश्न सगळ्यांना पडला कारण ज्या लोकांनी पाहिलं असेल त्यांना कळलच असेल कि त्याची उष्णता ही फार मोठ्या प्रमाणात होती आणि ते दीप सतत तेवत ठेवायचे होते.

जे coordinators होते म्हणजे प्रीतीवीरा रासकर, पल्लाविवीरा कानडे, वैशालीवीरा प्रभू ,उदयसिंह वायीम, महेंद्रसिंह कुऱ्हाडे, महेशासिंह मलगोंडा, अमोघासिंह अनभावणे आणि इतर काही मंडळींच्या मनात ही तोच प्रश्न कि, रात्रीचे फायर फायटर खूप कमी असायचे पहिल्या दिवशी फक्त ६ च होते आणि आपली गरज जवळपास २० ची होती अश्या परिस्थितीत कसं सांभाळाव तेच कुणाला काही काळात नव्हत.

रात्र झाली आणि पौरससिंह ना हे सगळ सांगण्यात आल. पौरसासिंह स्वतः त्या रात्री जे coordinators होते त्यांना भेटायला आले. त्यांनी सगळ्यांना परिस्थिती कशी सांभाळायची ह्याबद्दल मार्गदर्शन केल.
पौरससिंह  पुढे म्हणाले " अरे तुमच्या लक्षात आल का श्रद्धावानासाठी योगायोग हा काहीही नसतो. ते त्याने केलेलं प्रीप्लानिंग असत. मला तुम्ही एक सांगा का ते २ extinguisher फोम चे आले? आणि पहिल्यादिवशी ६ , दुसऱ्या दिवशी ११ आणि आजच का १९ फायर फायटर आलेत?
नाही हा योगायोग वगैरे काहीही नसतो फक्त इतर लोकांनी दिलेलं नाव आहे. हा योगायोग श्रद्धावानांसाठी नसतो."

मित्रानो त्यांनी जे काही सांगितल ते सगळ इथे मांडण शक्य नाही. पण मग जे फायर फायटरच नाही तर ज्या भक्तांनी त्याचं बोलन ऐकल ते सगळे आपल्या बापुरायाला आणि मोठ्या आईला धन्यवाद देऊन व त्यांचंच नाव घेऊन पुन्हा एकदा जोमाने आपली सेवा करू लागले कुठलंही टेन्शन न घेता.
खरच सदगुरुच आपल्या जीवनात कोणतेही disaster घडू नये म्हणून सदैव तत्पर असतो आणि त्यासाठी तो अखंड झटतच असतो 108%.