Saturday, June 11, 2011

श्रद्धावान आणि योगायोग

हरी ओम

Disaster Management Plan (Fire Fighting) ही सेवा AADM तर्फे आपल्या संस्थेतील कार्यक्रमामध्ये व उत्सवामध्ये चालवली जाते. जे काही आपल्या फायर फायटिंगचा कोर्स ज्या DMV नी केलेला आहे ते DMV ही सेवा करू शकतात. ही सेवा आपल्या कार्यक्रमात काही दुर्घटना घडू नये किंवा जरी झाली तरी ती वेळीच रोखता यावी म्हणून AADM तर्फे राबवली जाते.
श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सव मध्येही संस्थेने फायर फायटर ठेवले होते. ह्या उत्सवासाठी सुमारे ७० fire extinguisher आणण्यात आले होते. ह्यातले ४ extinguisher  हे buoy म्हणजेच ५० किलोग्राम वजनाचे होते. परंतु मागवताना ते ४ extinguisher water type चे मागवले होते परंतु काही कारणास्तव आपल्याकडे येताना ते २ water type आणि २ foam type . हा फोम फक्त आपण तेल असणाऱ्या ठिकाणीच वापरू शकतो अन्य ठिकाणी वापरू शकत नाही म्हणून आपण ते कमी मागवले होते. आणि तेल फक्त २ ठिकाणी होते ते म्हणजे प्रसादालय आणि महलक्ष्मि दीप.

उत्सव सुरु होऊन 3 दिवस झाले आणि सगळ काही व्यवस्थित चालू होत. महालक्ष्मी दीप च्या ठिकाणी सगळे श्रद्धावान जे सुर्स्नेहन द्रव्य अर्पण करत होते ते आपण recycle न करता तिथेच जाळलं जाव अस सामिरादादानी सांगितलं. आणि तिथे दीपोत्सव करायला सांगितला. दिवसा फायर फायटिंग व्यवस्थित चालू होती परंतु रात्रीच काय करायचं? हा एकचं प्रश्न सगळ्यांना पडला कारण ज्या लोकांनी पाहिलं असेल त्यांना कळलच असेल कि त्याची उष्णता ही फार मोठ्या प्रमाणात होती आणि ते दीप सतत तेवत ठेवायचे होते.

जे coordinators होते म्हणजे प्रीतीवीरा रासकर, पल्लाविवीरा कानडे, वैशालीवीरा प्रभू ,उदयसिंह वायीम, महेंद्रसिंह कुऱ्हाडे, महेशासिंह मलगोंडा, अमोघासिंह अनभावणे आणि इतर काही मंडळींच्या मनात ही तोच प्रश्न कि, रात्रीचे फायर फायटर खूप कमी असायचे पहिल्या दिवशी फक्त ६ च होते आणि आपली गरज जवळपास २० ची होती अश्या परिस्थितीत कसं सांभाळाव तेच कुणाला काही काळात नव्हत.

रात्र झाली आणि पौरससिंह ना हे सगळ सांगण्यात आल. पौरसासिंह स्वतः त्या रात्री जे coordinators होते त्यांना भेटायला आले. त्यांनी सगळ्यांना परिस्थिती कशी सांभाळायची ह्याबद्दल मार्गदर्शन केल.
पौरससिंह  पुढे म्हणाले " अरे तुमच्या लक्षात आल का श्रद्धावानासाठी योगायोग हा काहीही नसतो. ते त्याने केलेलं प्रीप्लानिंग असत. मला तुम्ही एक सांगा का ते २ extinguisher फोम चे आले? आणि पहिल्यादिवशी ६ , दुसऱ्या दिवशी ११ आणि आजच का १९ फायर फायटर आलेत?
नाही हा योगायोग वगैरे काहीही नसतो फक्त इतर लोकांनी दिलेलं नाव आहे. हा योगायोग श्रद्धावानांसाठी नसतो."

मित्रानो त्यांनी जे काही सांगितल ते सगळ इथे मांडण शक्य नाही. पण मग जे फायर फायटरच नाही तर ज्या भक्तांनी त्याचं बोलन ऐकल ते सगळे आपल्या बापुरायाला आणि मोठ्या आईला धन्यवाद देऊन व त्यांचंच नाव घेऊन पुन्हा एकदा जोमाने आपली सेवा करू लागले कुठलंही टेन्शन न घेता.
खरच सदगुरुच आपल्या जीवनात कोणतेही disaster घडू नये म्हणून सदैव तत्पर असतो आणि त्यासाठी तो अखंड झटतच असतो 108%.

No comments:

Post a Comment