Monday, December 19, 2011

अधिवेशन २०११ परम पूज्य बापूंचे श्रद्धावानांना मार्गदर्शन - 13th & 14th Nov. 2011

हरी ओम,
परम पूज्य सदगुरू श्री अनिरुद्ध बापूनी अधिवेशन २०११ मध्ये १३ व १४ नोव्हे. २०११ रोजी श्रद्धावानांस केलेले मार्गदर्शन येथे देत आहे.
Source : Pradeepsinh Kadav - Santacruz (W)

Wednesday, October 26, 2011

Diwali Greetings

"जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी हि खरोखरच अलौकिक आहे. हि दिवाळी 
तुमच्या जीवनात नंदाईच्या पावलाने वैभव व सूचितदादांच्या रूपाने सुख व समाधान घेऊन येवो व  
तुमचे सारे जीवन अनिरुद्धमय करो. हीच दत्तबाप्पा, हनुमंत व मोठ्या आईच्या चरणी प्रार्थना!!!"

"अनिरुद्ध दीपावलीच्या अनिरुद्ध शुभेच्छा !!!"





Wednesday, October 19, 2011

मला भेटण्या आला बापू ....................!!!

हरी ओम

मला जळगाव येथील श्री अनिरुद्ध आनंदोत्सवात जायला मिळाले नाही. माझे दोन्ही पायांना fracture असल्यामुळे मला ते शक्य झाले नाही. परंतु श्री अनिरुद्ध आनंदोत्सवाच्या प्रत्येक गोष्टी फेसबुकच्या माध्यमातून अनुभवण्यास येत होती त्यामुळे खूप खुश होतो. बापूंचे मुंबईहून झालेले प्रस्थान ते बापू जळगाव हून निघाल्यापासून मुंबईला पुन्हा पोहचे पर्यंत सगळ्याच गोष्टी फेसबुक वरून अनुभवण्यास मिळाल्या.

श्री अनिरुद्ध आनंदोत्सव संपला नव्हता तर, जळगाव येथील श्रद्धावानांच्या जीवनातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील श्रद्धावानांच्या जीवनात सुरु झाला. खर तर बापू मिळाल्यापासूनच श्रद्धावनाच्या जीवनात आनंदोत्सव येतो. तेही अनिरुद्ध गतीने.

१८ ऑक्टो. संध्याकाळी मला निवाससिंह ह्यांचा मेसेज आला कि- 'बापू कामयानी expess ने येत आहेत व कल्याणला ती ट्रेन ९.५५ला येणार आहे ज्यांना बापूंच्या स्वागतासाठी जायचं असेल ते जाऊ शकतात. शेवटच्या डब्यात बापू आहेत '
मनात तर खूप येत होते कि, आपल्याला जायला मिळाल असत तर किती बर झाल असत बापूंच दर्शन झाल असत. पण ते शक्य नव्हत कारण, मला साधे उभे राहणेही शक्य नाही तर कस होऊ शकेल? शिवाय कल्याण स्टेशन वर जिने चढ- उतरणे आलेच. आणि घरात एकटी आईच असल्यामुळे मला कोण घेऊन जाणार तिथपर्यंत. शिवाय तिथे सर्व श्रद्धावानाची गर्दी असणारच आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे नेहमीची गर्दी तर अजूनच असणार मग तर हे शक्यच नाही. म्हणून मी फक्त विचार करून गप्प बसलो. आणि फेसबुक वरील अपडेट चेक करत होतो.

संध्याकाळचे ८.१५ वाजले होते माझा फोन वाजला
आणि निवाससिंहनि मला सांगितले "९.०० वाजता तयार राहा बापूंना भेटायला जायचे आहे."
मी म्हटलं "अरे कस शक्य आहे मला येण?"
 तर त्याने सांगितलं "तू काही काळजी करू नकोस सगळी arrangement झालेली आहे नाही म्हणू नकोस. "
आणि फोन ठेऊन दिला.

त्याने सांगितल्याप्रमाणे मी ९.०० वाजता तयार राहिलो. तो आणि अजून ३ जन मला घ्यायला आले आणि मला गाडीतून स्टेशन वर आणलं तिथे wheelchair वरून जीन्या वर आणलं. जिन्यावर कोणत्या platform गाडी येणार हे माहित नसल्यामुळे श्रद्धावानाची गर्दी जमलेली होती तेथेच आम्हीहि थांबलो. काही वेळाने सगळे श्रद्धावान platform ४ वर गेले. गर्दी खूप होती म्हणून बापूंच दर्शन होईल कि नाही ह्या विचाराने मी सांशक होतो. हा विचार करत करताच आम्हीही  platform ४ वर जायला निघालो. इतक्यात announcement झाली कि ट्रेन platform ६ वर येत आहे. त्यामुळे आम्ही सगळे जन platform ४ ऐवजी platform ६ वर धक्का बुक्की न करता अगदी आरामात आम्हाला जायला मिळाले.
ट्रेन आल्यावर सगळीकडे बापूंचा जय जयकार सुरु झाला. आणि बापूंच्या बोगीजवळ गर्दी झाली आम्ही मागेच होतो. परंतु बाप्पा मला मुळीच असा सोडणार नव्हता. सगळ्याची बाप्पाच्या दर्शनासाठी झुंबड असताना आणि एवढी गर्दी असताना मला त्या गर्दीतून वाट काढत काढत बापुंपर्यंत नेण्यात आले. "बापूनी एक मस्त गोड स्मितहास्य केल आणि thumbs up करून आशीर्वाद दिले इतकेच नाही तर सावकाश काही काळजी करू नकोस मी (बापू ) आहे ना. असे खुणावले. व २ वेळा मुका घेतला."
एरवी पायाची जास्त हालचाल झाली कि पाय दुखायला लागायचा परंतु एवढ्या गर्दीतून जाऊन आणि पायाला २-३ वेळा धक्का लागूनही मला जराही दुखापत झाली नाही.

मला गर्दीतून बाहेर आणण्यात आले. तेथे पूज्य समीरदादा भेटले समीर दादांनी मस्त हरी ओम केल आणि माझा हात हातात घेऊन  म्हणाले "बिनधास्त एकदम!!!"

ट्रेन अजूनही स्टेशन वरच थांबलेली होती. थोड्यावेळाने बापू आत गेले आणि दरवाज्यावरील गर्दी कमी झाली. मला सगळ्यांनी पुन्हा बापू ज्या दरवाज्यात येणार होते त्या दरवाज्यात आणले. मी बापूंची वाट बघू लागलो इतक्यात ट्रेन सुटणार आणि बापू  धावत धावतच दरवाज्यात आले आणि मला हात दाखवला व पुन्हा २-३ वेळा मुका घेतला. बापूंनी बिनधास्त काही काळजी करू नकोस असे ट्रेन पुढे जात असताना सांगितले.

मी फक्त इच्छा प्रकट केली होती आणि ती त्यानेच सत्यात उतरवली आणि मला जो आनंदोत्सव अनुभवायला मिळाला नाही म्हणून मी रडत होतो. तो त्यानेच माझ्या जीवनात घडवून आणला. मी फक्त एक पाऊल चाललो, खरतर तेही त्यानेच चालविले आणि त्यानेच बाकीची ९९ पावले चालून मला तो भेटायला आला १०८% आणि मी ह्याची देही ह्याची डोळा आनंदोत्सव अनुभवला.



मला भेटण्या आला बापू,
मला भेटण्या आला!!!


श्री राम!!!
श्री राम !!!
श्री राम !!!!!!!!

Thursday, October 13, 2011

अगाध शक्ती अघटीत लीला ....................

हरी ओम,


अगाध शक्ती अघटीत लीला तव सदगुरूराया
जड जीवाते भावी तराया तू नौका सदया

       दिनांक २३ ऑगस्ट २०११ रोजी मला कंपनीच्या कामानिमित्त पुण्याला यावे लागले होते. मी mechanical enigineer म्हणून माझ्या कंपनीत काम करतो. पुण्याला Tower Crane च्या कामासाठी मी आलो होतो ते काम ५ ते ६ दिवस चालणार होत.

       दिनांक २५ ऑगस्ट २०११ रोजी संध्याकाळी मी क्रेन वर चढलो होतो. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा संध्याकाळचे ७.३० वाजलेले होते. परंतु त्यावेळी माझ्या मनात दुसरेच विचार चालू होते, मी काम तर करत होतो पण त्या विचारांमुळे माझ त्याकडे पूर्णपणे लक्ष नव्हत. आणि अश्यातच अचानक मी ज्या शिडीवर चढलेलो होतो त्या शिडीचा वरचा भाग पिन मधून निघाला आणि अश्यातच माझा तोल गेला. आणि मी काही कळण्याच्या आतच खाली पडलो मी त्यावेळेस बापुरायला हाक सुद्धा मारू शकलो नाही. आजू बाजूला सगळ क्रेन च समान पडलेलं होत. जर मी त्यावर पडलो असतो तर मला कुठे कुठे आणि किती लागल असत ह्याचा अंदाजसुद्धा करता येणार नाही. मी जवळपास १०ते १२ फुटावरून पडलो होतो. अश्या परिस्थितीत मी उभाच्या उभा पडलो जणू काही बाप्पानेच मला पकडल आणि अलगद आणून जमिनीवर ठेवलं. फक्त मला पायाच्या टाचांना मार लागला होता,रक्ताचा एक थेंब सुद्धा निघाला नाही. मी त्यानंतर खाली बसलो बघतो तर इतर कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मार लागला नव्हता.

      पुणे हे शहर माझ्यासाठी अनोळखी होते. आणि माझ्या बरोबर असलेले सहकारी २ घे जन तेही मुंबईचेच होते आणि शिवाय अमराठी होते. त्यामुळे माझे स्नेही व बापुभक्त श्री संदीपसिंह देवकर ह्यांना तसाच बसल्या बसल्या मुंबईला फोन लावला. त्यादिवशी गुरुवार असल्यामुळे ते श्रीहरीगुरूग्राम ला आलेले होते तसेच त्यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर जयेशसिंह शाह होते. संदीपसिंह शी मी बोललो झालेली घटना थोडक्यात सांगितली त्यांनी जयेशसिंह ना फोन दिला आणि मला बोलायला सांगितलं, त्यांनी मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन X-Ray काढायला सांगितले.

       संदीपसिंह ह्यांनी नेहावीर पाताडे ह्यांना घडलेली घटना सांगितली व पुण्याचे बापुभाक्ताना तिथे पोचायला सांगायला सांगितले. नेहावीरा ह्यांची परीक्षा असल्यामुळे त्या श्रीहारीगुरुग्राम ला आलेल्या नव्हत्या त्या घरीच होत्या. त्या Parade consultant असल्यामुळे त्यांच्याकडे पुण्याचे contacts  होते. त्याही पुण्याचे Active DMV म्हणजेच दत्तात्रयसिंह गावडे ह्यांचा नंबर शोधू लागल्या त्यांचा फोनचा प्रोब्लेम झाल्यामुळे त्यांच्याकडे सेव्ह केलेले नंबर डीलीट झाले होते. पण त्या घरीच असल्यामुळे त्यांनी तो नंबर त्यांच्या email मधून काढला आणि पुण्याला फोन लावला.

          ह्या ठिकाणी मी स्वतः सह कर्मचार्यांना रिक्षा आणायला सांगितली व त्यात त्यांनी मला उचलून ठेवले मी उभा देखील राहू शकत नव्हतो एवढ्या प्रचंड वेदना होत होत्या. रिक्षावाल्याने मला जवळच असलेल्या रुबी हॉल क्लिनिक ह्या हॉस्पिटल मध्ये पोचवले. मी त्या हॉस्पिटल मध्ये आलो तेव्हा ८ वाजले होते आणि मी जेव्हा पडलो ती वेळ ७.४५ होती. मला संदीपसिंह यांना फोन करून अवघे १५ मिनिट झाली असतील तोच तेथे रुपेशसिंह सावंत हे पुण्याचे बापुभक्त माझ्याजवळ पोहचले. कोणतेही नेटवर्क फेल झाल तरी मी बापुरायाच्या नेटवर्कमध्ये होतोच. त्यावेळी तो फोन करण्याचे सुचविणारा माझा बापुरायाच होता. त्या एका फोनने सगळे काम केले होते. वास्तविक बघायला गेल तर अनोळखी शहरामध्ये मला एवढ्या तातडीने मदत मिळणे १५ ते २० मिनिटात आणि तेही आपल्या माणसांची हे मी अपेक्षित केल नवत. परंतु माझ्या बापुरायचं नेटवर्क सगळीकडे आहे त्यामुळेच मला लगेच मदत मिळाली.  रुपेशसिंह नीच मला X-Ray काढायला नेल आणि नंतर काही वेळाने तेथे दत्तात्रयसिंह गावडे पोहचले त्यांनी मला खूप आधार दिला. X-Ray रिपोर्ट्स आल्यावर २ही पायाला Fracture असल्याच निदान झाल. त्या हॉस्पिटल मध्ये २- ३ डॉक्टर्सनी मला चेक केल प्रत्येकाने मला विचारल कसं पडलो आणि किती उंचावरून पडलो ते प्रत्येक जन आश्चर्यचकित होऊन एकचं म्हणत होते एवढ्या वरून पडून सुद्धा तुझ्या मणक्याला धक्का सुद्धा कसं लागला नाही. ते एवढाच म्हणत होते " YOU ARE LUCKY ". तो सगळ तारणारा माझ्यासोबत असताना मी LUCKY असणारच ना मित्रानो.

        दत्तात्रयसिंह ह्यांचे मित्र व पुणे केंद्राचे श्रद्धावान डॉक्टर योगेशसिंह खंडाळकर हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांना दत्तात्रयसिंह  ह्यांनी फोन केला व घडलेले घटना सांगितली व त्यांनी ताबडतोब तेथून निघून दीनदयाळ मेमोरिअल हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. तर तेथे ते आम्ही सगळे पोचण्याच्या आधीच आले होते त्यावेळी रात्रीचे १०.१५ वाजले होते. पण तोपर्यंत मला काहीच माहित नव्हत कि मला नक्की काय झालाय. मला डॉक्टर योगेशसिंह खंडाळकर ह्यांनी व्यवस्थित सांगितलं. तेथे मला त्यांनी प्लास्टर केल २हि पायांना. आणि नंतर नक्की कुठे काही दुसऱ्या ठिकाणी मार लागलेला आहे कि नाही हे चेक करण्यासाठी पूर्ण शरीराचे X-Ray काढण्यासाठी मला पाठवण्यात आल. माझे एकूण ११ X-Ray त्या दिवशी काढण्यात आले, आणि सगळे reports २०-२५ मिनिटात आल्यावर चेक केले तर फक्त टाचा व्यतिरिक्त मणक्याच्या डिस्क २ ठिकाणी बाहेर आल्यासारखे भासत होते म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी MRI काढण्याचा सल्ला दिला. मला नक्की काय झालाय हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं व तसेच डॉक्टर जयेशसिंह शाह ह्यांच्याशी सुद्धा त्यांनी सल्ला घेतला. ते म्हणाले operation करावे लागेल व काही मोठ नाहीये २ही पायात तारा ठोकून हाड नीट बसवली जातील व नंतर २ महिन्यानंतर त्या तारा काढल्या जातील मग तू व्यवस्थित चालू शकतोस.

          डॉक्टर योगेशसिंह ह्यांना २ दिवसासाठी नाशिकला कामानिमित्त जायचं होत व तसेच माझ्या पायाला सूज होती म्हणून आपण operation मंगळवारी करूयात मी सोमवारी येईनच असे म्हणून ते रात्री १.०० वाजता निघाले. तो पर्यंत माझ्यासोबत दत्तात्रयसिंह, रुपेशसिंह व अजून दोघे जन सोबत होते.दत्तात्रयसिंह म्हणाले सूचितदादांनी इथेच उपचार करायला सांगितलेत व नंतर डीसचार्ज दिल्यावर मुंबईला जायचं आहे. माझ्यासोबत सहकर्मचारी असल्यामुळे ते सगळे  रात्री १.३० वाजता हॉस्पिटल मधून निघाले.  मला असह्य वेदना होत होत्या ३ झोपेच्या गोळ्या व जवळपास ४ पेन किलर चे injection देऊन सुद्धा मला ना झोप लागत होती ना वेदना कमी होत होत्या.माझे नामस्मरण सतत चालूच होते. मग शेवटी तिथल्या डॉक्टर्सनी डॉक्टर योगेशसिंह ह्यांना फोनवरून सांगितलं मग त्यांनी सकाळी ४.३० वाजता माझ्या उजव्या पायाला असलेल प्लास्टर कापलं आणि त्यात cotton भरला त्यामुळे मला खूप आराम मिळाला व मग मला शांत झोप लागली.

        दुसऱ्या दिवशी मला भेटायला पुणे केंद्राचे बरेच जन येऊन भेटून गेले परंतु मला त्या दिवशी सकाळी झोपेच्या गोळ्यांमुळे कोण आल व कोण गेल ह्याच काही भान नव्हत. नंतर दुपारी दीड वाजता माझे बाबा पालघर हून तेथे पोचले.
तसेच २७ तारखेला मुंबईहून गुरुप्रसादसिंह सावंत, निवाससिंह शेंडे व सुदर्शनसिंह तिघे जन मला भेटण्यास आले.

       २९ तारखेला सकाळी मला MRI काढण्यासाठी नेण्यात आले. परंतु सगळे reports नॉर्मल आलेले होते. मला मणक्याला कुठेही काही झालेलं नव्हत २ ठिकाणी थोडीशी डिस्क सरकलेली वाटत होती पण डॉक्टर म्हणाले हे नॉर्मल आहे ह्याने काही एक फरक पडत नाही.

       नंतर ३० तारखेला माझ operation करण्यात आले व ते operation सुद्धा डॉक्टर योगेशसिंह ह्यांनीच केल. व नंतर ते म्हणाले operation बापूंच्या कृपेने एकदम व्यवस्थित झालेले आहे त्यांनी मला त्याचे X-Ray ही दाखवले. आणि "श्री राम" म्हणायला सांगितलं.

      मी हॉस्पिटल मध्ये असताना रोज मला कोणी ना कोणी बापुभक्त भेटायला येत होता माझी विचारपूस करत होता. दत्तात्रयसिंह गावडे ह्यांच्या नातेवाईकांना रविवारी दिनांक २८ ऑगस्ट रोजी गाडीचा अपघात झाला होता व त्यातील एक ११ वर्षांची  मुलगी कोमात जाऊन मृत्यूमुखी पडली. अश्या परीस्थित सुद्धा त्यांनी माझ्याकडे कधी दुर्लक्ष केल नाही. ते तिथे तर जातच होते परंतु माझ्याकडे सुद्धा येतच होते. ते माझ्यासाठी का एवढ सगळ करत होते. फक्त त्यांच्या मनात एकाच होत हा बापूचा आहे म्हणजे आपला आहे. हे त्याचं बापुवरच प्रेम बघून मन भारावून गेल.

     हे ही कमीच म्हणून कि काय मला ज्या दिवशी डिस्चार्ज दिला त्या दिवशी सुद्धा मुंबईहून भूषणसिंह कानडे, संतोषसिंह तावडे व कौस्तुभसिंह किस्मतराव हे तिघे जन मला मुंबईला घेऊन येण्यासाठी गाडी करून घ्यायला आले आणि मला मुंबईला आणले.

     बापूंची लीला ही अगाध आहे. बापूनी पुढील काळात माझ्यावर येणारे संकट तर टाळलेच होते परंतु  मला आर्थिक फटका बसू नये म्हणून मला झालेला हॉस्पिटलचा खर्चही कंपनी कडून मिळवून दिला. मला जवळपास १ लाख रुपये खर्च आला होता. जर मी कामावर नसताना पडलो असतो तर मला तो खर्च मिळालाही नसता. परंतु त्यानेच हे सगळे संकट टाळले व मला होणारा आर्थिक खर्चही टाळला.

     आज मी बापूंच्या कृपेने सुखरूप आहे व लवकरच चालता येण्याची वाट बघतो आहे. संस्थेच्या सेवाकार्यात भाग घेण्याची तयारी करतोय. बापूच माझ्याकडून सर्व काही करून घेतील.


अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
श्री राम

Tuesday, July 26, 2011

AIGV- आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस... (by Sudhirsinh Waidande)

गेले दीड महिना जे काही रोपे सातारा उपासना केंद्रात तयार करण्यात आली, त्यामधील शेवटचा लोट ज्यामध्ये झेंडू, घाणेरी(टन-टनी),बाभूळ,सुबाभूळ,ग​ ावटी-गुलाब,धुरांडी,शेवगा याप्रकारची ७४०० रोपे घेऊन सकाळी ८.३० ला श्रीगोविद्यापीठंम येथे पोहचलो. गेटचा जवळ जाता क्षणी कळल कि आज बापू,आई,दादा आले आहेत.तेह्वा मनात सर्वांनी एकच ठरवलं कि आजचा दिवस बाप्पा सोबत लुटून घ्यायचा. सकाळी रेपोर्टिंग करून सर्वांनी नाश्ता करून घेतला. त्यानंतर विजयमंत्र घेऊन सेवेला सुरुवात केली...सर्व रोपे ट्रकमध्ये असल्याने ट्रक आत आणायचे चालू होते पण मागील गेट समोर काही गाड्या असल्याने आह्मी ट्रक आत येण्याची वाट सर्व जन एकाच जागी उभे होतो...
तेवढ्यात बापू,आई, दादा रूम मधून बाहेर आले...आई पुढे होती त्यामुळे सर्वांनी आईला हरि ओम म्हणाले....आई पण आह्माला हरि ओम म्हणाली,आईसोबत बोलत असताना मागून बापू ही आले...मग आमचा मोर्चा बापूकडे आला...सर्व जन बापूना हरि ओम म्हणाले...बापूनी नेहमीप्रमाणे गोड हसून हरि ओम म्हणाले..... आजपर्यंत बापूंशी फक्त हरि ओम म्हणून दर्शन घेणे एवढच होत-होते पण त्या दिवशी पहिल्यांदा बापू सर्वांशी बोलायला थांबले मी आणि अजून दोघे पुढे असल्याने बापूं आमचा नजरेत-नजर घालून बोलत होते....आणि म्हणाले " बाळानो शेतकरी आत्महत्या करतायत, आपले सरकार त्यांना काहीही मदत पुरवत नाहीये, त्यांना कोणतीही मदत मिळत नाहीये, तर इथे शिकून गावातील प्रत्येक घरी जावा, त्यांना मदत करा..."
एवढ बोलले न पुढे निघाले तेवढ्या आह्मी म्हणालो" बापू साताऱ्याला कधी येणार..त्यावर बापू म्हणले "हो, येणार.. नक्की येणार...लवकरच येणार आहे..." मग आई ला आह्मी म्हणालो आई तू पण ये...मग आई पण म्हणली.."हो..मी पण येणार आहे साताऱ्याला..."..
मग आह्मी सेवेला जोमाने सुरुवात केली...मग रोपांचे शिफ्टिंग सुरु झाले...सर्व शिफ्टिंग झाल्यावर, दुपारी आम्ही जेवण केले.मग आह्मी संध्याकाळी आरतीसाठी द्वारकामाईत गेलो.
७.३० आरती झाली न आह्मी दर्शन घेऊन निघालेलो..जाता जाता बापूंचे पण दर्शन करून जाऊ असे ठरवून आह्मी बापूंचा रूमचा इथे गेलो...आणि बघतो तर काय..बापू,आई,दादा आणि सर्व जन तिथे बसलेले होते..न कोणी तरी बापूंचे पाय चेपण होते...आह्माला वाटल बापू काही आता उठणार नाहीत...लांबूनच दर्शन घेऊन जाव लागणार...तेवढ्यात आईची नजर अम्चावर पडली आणि आईने हरि ओम म्हणत हात केला तेह्वाच आई ला आह्मी सर्वांनी वाढदिवसाचा in advance शुभेच्छा दिल्या ...नंतर लगेच बापूनी ही खुर्ची मागे फिरवून आह्माला हाथ केला...आह्मी परत बापुना म्हणालो "बापू लवकर या साताऱ्याला,आह्मी वाट बघतोय तुमची."...
त्यावर बापू म्हणाले "yes,नक्की येणार असे म्हणत thumb up केला आणि....नीट जा,मज्जा करत जा असे म्हणून एक गोड असा flying kiss दिला.."
तोच गोड flying kiss घेऊन आह्मी बापू आई दादांचा निरोप घेतला व परत घरी यायला निघालो...
हाच होता माझा आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस..
|| हरि ॐ ||
 
 by Sudhirsinh Waidande

Saturday, July 23, 2011

जसे चिडीच्या पायासी दोर ............


|| हरी ओम ||
मला बापूंकडे आणलं ते माझ्या बाबांनीच. माझ घर हे केळवेरोड येथे आहे आणि माझ प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिथेच बापूंच्या कृपेने पूर्ण झालं. मला आजही आठवतंय मी तेव्हा आठवीत होतो एक दिवस म्हणजे तो दिवस गुरुवारच होता बाबांना घरी यायला उशीर झाला होता रात्रीची शेवटची गाडी पकडून ते घरी १.०० वाजता आले. माझी शाळा सकाळी ७.२० ची असायची म्हणून मी लवकर झोपलो होतो. पण सकाळी जेव्हा उठलो तेव्हा बाबांनी बापूंचे चार छोटे फोटो आणले होते. ते आम्हा प्रत्येक घरातील व्यक्तीला दिले म्हणजेच माझ्या भावाला, मला आणि आईला व एक स्वतःकडे ठेवला. मला प्रथम दर्शन बापूंच तेव्हाच झाल बाबांनी आणलेल्या त्या फोटोच्या रुपात. बाबा आईला सगळ काही सांगत होते कि त्यांना गुरुवारच्या बापूंच्या प्रवचनाला जाऊन तिथे कस वाटल ते सगळ काही सांगत होते मी ते ऐकत होतो पण मला त्यातलं काहीही कळत नव्हत पण ते ऐकताना मला काहीतरी एक वेगळीच मजा येत होती आणि एक वेगळंच कुतूहल मनात निर्माण झाल कि कोण हे बापू आणि हे काय आहेत? काहीही कळत नव्हत.

त्या दिवसापासून माझे बाबा ज्या गुरुवारी वेळ मिळेल त्या गुरुवारी बापूंच्या प्रवचनाला येऊ लागले. बाबा स्टारवृत्त हा पेपर घेऊन येत असत आणि तो आम्हाला वाचायला देत असत. त्यानंतर बघता बघता २ वर्ष अशीच निघून गेली. माझ दहावीच वर्ष होत आणि परीक्षेला काही दिवसच उरलेले होते. आणि मला बाबांनी परीक्षेच्या आदल्या आठवड्यात प्रवचनाला घेऊन आले आणि बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन आलेत. मला तेव्हाही एवढ काही कळत नव्हत. मला फक्त एवढाच आठवतंय कि बापूनी त्या दिवशी प्रवचनात काही गोष्ट सांगत असताना आकाशातील तारे व ग्रहांचा उल्लेख केलं होता. मीही थोडा चंचल मनाचा होतो आणि हॉल मध्ये बसल्यामुळे मला बापूही दिसत नव्हते आणि पहिल्यांदाच एवढा वेळ स्तब्ध बसून राहायला मला जमत नव्हत. माझ प्रवचनाकडे लक्षही नव्हत. प्रवचन संपल्यावर सगळे जन दर्शन घेऊन निघत होते तसच मीही माझ्या बाबांबरोबर दर्शन घेण्यासाठी गेलो व पेपर व्यवस्थित जाऊदे अस सांगितलं. आणि तेथून निघालो. परीक्षेच्या पहिल्या दिवसाच्या आधीही गुरुवार होता. बाबांनी मला परीक्षेच्या दिवशी पेपर सुरु होण्याच्या आधी बाप्पाच एक मस्त उदिच पेन आणून दिल व ह्यानेच पेपर लिह अस सांगितलं. मग काय मला परीक्षेची भीतीच उरली नाही.

परीक्षा संपली आणि शेवटी निकालाची वेळ आली निकाल लागला बापूंच्या कृपेने मला बापूनी ७८.२६ % मार्क्स मिळवून दिले. मला इंजिनीरिंग च्या पदविका(डिप्लोमाला ) प्रवेश घ्यायचा होता आणि तो ही यंत्रअभियांत्रिकी ( Mechanical Engineering) शाखेतच हवा होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मला खाजगी कॉलेजला प्रवेश घेणे परवडणारे नव्हते. आणि त्या मानाने माझा शासकीय कॉलेजात प्रवेश मिळणे कठीण वाटत होत. मी ३ ठिकाणी फॉर्म भरले होते वसई येथील वर्तक पॉलीटेक्निक, भागुभाई पॉलीटेक्निक आणि शासकीय तंत्रनिकेतन मुंबई (बांद्रा ). वर्तक पॉलीटेक्निक  येथे माझा मेरीट वर नंबर आला पण हे खाजगी असल्यामुळे तिथली फी माझ्या बाबांना परवडणारी नव्हती. नंतर भागुभाई येथे मी प्रवेशासाठी गेलो तेथेही माझा नंबर आला परंतु तेथे ५०% जागा ह्या गुजराती समाजासाठी राखीव असल्यामुळे माझी Mechanical Engineering ची जागा गेली व मला नाईलाजास्तव Civil Engineering ला प्रवेश घ्यायला लागला तेही खाजगी कॉलेजच होत परंतु Government approved असल्यामुळे मला फक्त ८००० रुपये फी भरावी लागली आणि मी तेथे प्रवेश घेतला. त्यानंतर सगळ्यात शेवटी प्रवेश प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन येथे होती. शेवटचा प्रयत्न म्हणून Mechanical Engineering  ची जागा मिळते कि नाही हे बघण्यासाठी  मी तिथे गेलो. त्यादिवशी मी व माझे बाबा सकाळी लवकरच मेरीट नुसार नंबर येणार होता म्हणून घरून ७.०० वाजताच निघालो होतो. तिथे गेल्यावर अस कळलं कि ज्यांच्याकडे Cast Certificate असेल त्यांना फक्त २०० रुपयेच फी भरावी लागणार आहे. माझ्याकडे OBC च certificate होत. तेही बापूंनीच मिळवून दिल होत, हिंदू-मराठा होतो परंतु शेतकरी कुटुंब असल्याने कुणबी वर्गात मोडत असल्याने आम्हाला OBC च certificate मिळाल होत. त्यामुळे मला फक्त २०० रुपये फी भरावी लागणार होती. मला आजही आठवतंय माझ संध्याकाळी ७.०० ते ७.१५ च्या दरम्यान अडमिशन मिळाल तेही शेवटचीच जागा राहिली होती Mechanical Engineering ची ती मला बापुनीच मिळवून दिली. आणि वर मला जे मी भागुभाई कॉलेजला पैसे भरले होते तेही पैसे पूर्णच्या पूर्ण परत मिळाले. ज्या ठिकाणी मला २५००० ते ३०००० रुपये फी भरावी लागणार होती त्या ठिकाणी मला अवघी २०० रुपयेच फी भरावी लागली. आणि हे फक्त तो सदगुरूच करू शकतो बाकी कोणीही नाही. हेच त्याच अकारण कारुण्य.

प्रवेश तर झाला पण पुढे मला रोज केळवे ते बांद्रा असा up-down करणं सहज जमणार नव्हत म्हणून वसतिगृहात देखील अडमिशन घेतलं. ज्या कॉलेजला प्रवेश मिळाला ते कॉलेज म्हणजे Government Polytechnic Mumbai आणि तेही बांद्रा येथेच आहे व होस्टेल देखील कॉलेजच्या आवारातच आहे. आणि हे कॉलेज श्रीहरीगुरुग्राम पासून चालत अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.
त्यानंतर ३ ऑगस्ट २००४ रोजी माझं कॉलेज सुरु झालं आणि मी होस्टेलला पण राहायला आलो आणि काही दिवसातच श्रीहरीगुरुग्राम कुठे आहे हे शोधून काढलं आणि लगेचच्या गुरुवारपासून मी नियमित प्रवचनाला येऊ लागलो. आणि बापूंच्या चरणी स्थिर झालो.


जसे चिडीच्या पायासी दोर
बांधुनी आणिती तिजला समोर
तसेच मज तू ओढले खरोखर
तुला काळजी माझी हे मी उमगलो ||
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ||
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ||

|| श्री राम ||

Tuesday, July 12, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (०७.०७.२०११)

 !! हरि ॐ !!

    "ॐ मंत्राय नम:" सर्वबाधाप्रशमनं मध्ये आपण वमन बाधा बघतोय. किती झाल्या आतापर्यंत दोन! आज आपल्याला तिसरी व चौथी वमन बाधा बघायची आहे. ह्या नेहमी जोडीने फिरत असतात. एक असली की दुसरी असतेच. दोन्ही नेहमी एकत्रच राहतात व एकत्रच बाहेर पडतात. पण ह्याचा अर्थ एक बाधा टाकली तर दुसरीसुद्धा बाहेर जाईल असे होत नाही.
    ह्यातली एक बाधा जर बाहेर टाकली व दुसरी आत असेल तर बाहेर गेलेली बाधा परत आत येणार. कारण दोन्ही नेहमी एकत्र असतात. पण आतली बाधा बाहेर जात नाही. म्हणजेच दोघींपैकी एक बाधा बाहेर टाकली तर उरलेली आतली दुसरी बाधा बाहेर जात नाही. का? कारण, ह्या अश्या बाधा आहेत की, ह्यांच्यामुळे मनुष्याला जी गोष्ट हवी असते ती मिळत  नाही.
    काय हवे असते मनुष्याला? समाधान. ह्या समाधानाच्या आड येणार्‍या ह्या दोन बाधा आहेत. म्हणून ह्या दोघींना एकदम बाहेर टाकले पाहिजे. ह्या दोन्ही बाधांची नावेसुद्धा self explanatory आहेत. ह्यातली पहिली जी आहे ती असमा बाधा व दुसरी आहे ती अधान बाधा.
    असमा बाधा म्हणजे काय? तर मनुष्याला आपल्यासारखे दुसरे कुणी असू नये, असे वाटणारी जी वृत्ती, ती म्हणजे असमा.
    अनेकजण बोलतात की, "आमच्यासारखे दु:ख कोणाला नसू दे” पण असं बोलताना मनात खरोखर तसा भाव असतो का? नाही. एखादी व्यक्ती परिक्षेला जात असताना प्रत्येकजण त्याला Best of luck देतो, पण मनात मात्र worst of luck हा विचार असतो, असं का? कारण असमा बाधा. असमा म्हणजे "मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये माझ्यापेक्षा वरचढ कुणीही असता कामा नये.” उदाहरणार्थ, मी जर १०,००० कमावतो व ह्या कमाईमध्ये मी ज्या standard ने राहतो, त्यापेक्षा १०,००० कमाई असणार्‍यांमध्ये कुणीही (माझ्यापेक्षा)श्रेष्ठ असता कामा नये.  
    मनुष्य स्वत:ची level ठरवताना एकच निकष (criteria) लावतो तो म्हणजे स्वत:च्या सोयीचा. असा सोयीचा निकष लावणे म्हणजे अधान बाधा. माझ्यापेक्षा मोठं कुणीच असता कामा नये, असा प्रत्येक ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे मनुष्य निकष लावत असतो.
    एकच स्त्री पण ती सासूच्या भूमिकेत असेल तर सूनेसाठी वेगळा निकष लावते व आईच्या भूमिकेत असेल तर मुलीसाठी तिचा वेगळा निकष असतो. एखाद्या मुलाला त्याला आवडणारी मुलगी पटवायची आहे, आणि त्या मुलीच्या आजीच्या होकारावर त्यांचे लग्न अवलंबून असेल तर तो मुलगा त्या मुलीच्या आजीसाठी वाट्टेल ते करायला तयार होतो.
      म्हणजेच परिस्थितीनुसार, स्वत:च्या सोयीनुसार मनुष्य निकष बदलत असतो.
    १९९३ मध्ये मार्डच्या (MARD) डॉक्टर्सनी संप केला होता. तेव्हा एक गृहस्थ Private Medical College असता कामा नये म्हणून तावातावाने बोलत होते. आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या ह्या गृहस्थांच्या मोठ्या मुलांना चांगले मार्कस्‌ मिळून गर्व्हमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे Private College त्यांना चुकीचे वाटत होती. हेच गृहस्थ काही वर्षानंतर परत भेटले, तेव्हा Private College काढणे किती आवश्यक आहे, ह्याविषयी बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की, त्यांच्या धाकट्या मुलाला मार्कस्‌ कमी होते, म्हणून त्यांना त्याच्या   admission साठी Private डोनेशन घेणार्‍या कॉलेजची आवश्यकता वाटू लागली होती.
    नंतर काही वर्षांनी परत हेच गृहस्थ भेटले पुन्हा ते Private कॉलेजना दोष देऊ लागले. कारण, ह्यावेळी त्यांची मोठी मुलं त्यांना सोडून परदेशी गेली होती. त्यांच्या नातवाला चांगले मार्कस्‌ मिळाले होते पण आता ह्यांची आर्थिक स्थिती खालावली होती.
    म्हणजे, जेव्हा पहिल्यांदा पैसा होता, मुलांकडे मार्कस होते तेव्हा Private College त्यांच्यासाठी चुकीचे होते. दुसर्‍यांदा पैसा होता,  मुलांकडे मार्कस्‌ कमी  होते, तेव्हा Private College   त्यांच्यासाठी योग्य होते. तिसर्‍यांच्दा जेव्ह पैसा कमी व नातवाकडे मार्कस्‌ आहेत, तेव्हा पुन्हा Private College चुकीचे ठरवले गेले. म्हणजे निकष कश्याच्या आधारे लावला तर स्वत:च्या सोयीनुसार.
    बापूंनी हनुमान चलिसा म्हणायला सांगितली, एका दिवसात १०८ वेळा म्हणायला सांगितल्यावर एवढ्या स्पीड ने म्हटली जाते की हनुमानजी घाबरले. माझ्याकडे येऊन हनुमानजी म्हणाले की, ह्या तुझ्या भक्तांचा एवढा स्पीड आहे म्हणण्याचा की, तिथे माझा स्पीड पण कमी पडतो. सरस्वती देवी, जी वाग्देवता आहे, ती पण येऊन म्हणाली की, तुझ्या भक्तांचे उच्चार कळत नाहीत. दोघेही माझ्याकडे (परमपूज्य बापू) तक्रार घेऊन आले. म्हणून मग मी (परमपूज्य बापू) ऐकू लागलो, तर मला काहीच ऐकू आले  नाही. असे करु नका राजानों.
    १०८ वेळा हनुमानचलिसा म्हणणे ही उरकण्यासारखी गोष्ट नाहे. तुमचे उच्चार तुम्हाला नीट कळले पाहिजेत. सावकाश म्हटले तरी ५१/२ ते ६ तास पुरतात. काही जणांचे इथे ३ तासांत संपते, हे योग्य आहे का?  
    समजा तुम्ही शौचास बसलात आणि तेव्हाच नेमके तुम्हाला कुणी उठवले तर कसे वाटेल? कठीणच वाटेल ना. तसेच बुद्धीकडून एकदा आज्ञा निघाली की, त्यास आवर घालणे कठीण असते.
    प्रत्येक गोष्टीला आपल्या सोयीनुसार निकष लावणे, व आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ह्या गोष्टी जेवढ्या कमी करता येतील, तेवढ्या कमी करा. जेव्हा तुम्ही दोन्ही बाधा टाकण्यासाठी प्रयास करता तेव्हा जर त्यातल्या एका बाधेसाठी तुमचे प्रयास कमी पडत असतील तर तिथे कमी पडणारे प्रयास हनुमंत भरुन काढेल. पण जर दोन्हीपैकी फक्त एकच बाधा काढायला बघाल, तर तसे होणार नाही.
    मी "याँव” केले "ताँव” केले असे मनुष्य नेहमी म्हणत असतो, हे "मी याँव” म्हणजे काय? तर मांजराची वृत्ती, अप्रामाणिकपणा. मांजर जसे जिथे सोय तिथे धाव घेते, मग तीथे योग्य की अयोग्य बघितले जात नाही.
    नेहमी बघा, कुत्रा कधीही घरातल्या व्यक्तीखेरीज इतर कुणीही काहीही दिले तरी तिकडे ढुंकुनही बघत नाही. मांजराचे तसे नसते, ते जिथे त्याला खायला मिळेल तिथे धावते.
    असमा बाधा मनुष्याला मांजराप्रमाणे बनवते मांजर स्वत:च्याच घरात चोरुन खात असते. हे आपल्याच घरात चोरुन खाणे म्हणजे जे आपल्यावर उपकार करतात त्यांच्याशी कृतघ्न्तपणे वागणे. जे आपणहून द्यायला तयार आहेत, त्यांच्याकडून चोरुन घेणे इथे शब्दश: चोरणे असा अर्थ होत नाही.
    आपण स्वत:च स्वत:शी कसे वाईट वागत असतो बघा. आपले घुडगे wight barring  joints आहेत, ज्यांच्यामुळे आपण धावू शकतो. जे जॉईंट्स आम्हांला धावण्यासाठी, जिने चढण्यासाठी आवश्यक असतात, त्या जॉईंट्सना हवा असणारा व्यायाम आपण देतो का? घरात आपण खाली बसतो का? आम्हांला जेवताना  dinning table च लागते. मग ३०-४० वयामध्येच गुडघे दुखू लागतात. त्यात एवढे वजन वाढते. मग मला (परमपूज्य बापू) म्हणतात, "बापूराया, हे गुडघे दुखणे थांबव.
    आयुष्यभर खाली बसणे टाळले, गुडघ्यासाठी आवश्यक व्यायाम टाळले की मग डायनिंग टेबल, कमोड वापरण्याची वेळ येते.
    गुडघ्याच्या वरती जे  muscles असतात. त्यांना Quadriceps म्हणतात. ह्यांची ताकद जेवढी strong तेवढे गुडघे strong असतात. ही ताकद व्यायामामधूनच वाढते. आमचे जिभेचे, हाताचे (खाण्याचे) व्यायाम पुष्कळ असतात. पण गुडघ्याचे होतात का? वाढलेल्या वजनामुळे कित्येकांना जरा बसल्यावर पायाला मुंग्या येतात.
    बर्‍याचवेळा मनुष्य मी एवढं कमी खातो तरी माझं वजन जास्तच आणि दुसरा एवढं जास्त खातो तरी वजन कमीच अशी तुलना करत राहतो. पण कुठलीही स्त्री माझ्या शेजारणीचा नवरा चार लफडी करतो पण माझा नवरा करत नाही, अशी तुलना करते का? नाही. पुरुषसुद्धा दुसर्‍याची बायको बाहेर लफडी करते, पण माझी बायको करत नाही, अशी तुलना कधीच करत नाही.
    म्हणजे, माणसाला कुठे तुलना करायची नाही, हे चांगल्या प्रकारे माहित असते. तुलनेमधूनच सोय बघितली जाते व सोय बघण्यासाठीच तुलना केली जाते.
    दुसर्‍याकडे पैसा जास्त म्हणून मग मनुष्य आपली सोय बघून (टेबलाखालून) पैसा कमवतो. लक्षात ठेवा तुमचे निकष बदलले की, त्या परमेश्वराचेही निकष बदलतात. १०,००० रुपये महिना प्रामाणिकपणे मिळवणार्‍यांच्या रांगेऐवजी तुम्ही अप्रामाणिकपणे कमवणार्‍यांच्या रांगेत जाता.
    पण, तो परमात्मा तुमच्यासारखी तुलना करत नाही. तो काय सांगतो, "प्रत्येकाची रांग वेगळी!” त्याने जर स्वत:ची सोय बघितली तर कल्पना करा काय होईल? तुमच्या गाडीचा ब्रेक तुटला आहे. गाडी दरीत कोसळणार आहे. तुम्ही त्याला हाक मारताय, आणि त्याने म्हटले आता जरा आळस आला आहे, मग जातो, तर ते चालेल का? नाही. त्याने तेव्हाच आले पाहिजे  "तेव्हाच” हे महत्त्वाचे असते.
    म्हणून सद्गुरुंची तुलना कधी करु नका. जर खरोखरचा सद्गुरु असेल तर तो माझ्याशी समा व धान वागणार आहे म्हणजेच समाधान देणार आहे.
    सद्गुरुनां कश्यामुळे समाधान मिळते?
१)सद्गुरुंची तुलना इतर कुणाशीही केली नाही
२)तो सांगेल तोच निकष मानला, त्याच्या सांगण्याची तुलना इतर कश्यासोबत केली नाही.
    ह्या गोष्टी पाळल्या तर सद्गुरुस समाधान मिळते.
    आयुष्यात मनुष्याला समाधान मिळवायचे असेल तर त्याला सद्गुरुंशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.
    समजा, तुम्ही हातात फावडे घेतले व खड्डा खणून स्वत:ला त्यात पुरुन घेतले. म्हणजे चूक कोणी केली? तुम्ही.
    आणि मग असाच खड्डा तुम्ही सद्गुरुंसाठी खणला, त्यात त्यांना पुरुन त्यांच्यावर माती टाकली, आणि नंतर जर तुमच्या हाताला फावडे लागले किंवा तुम्हांला काही जखम झाली तर तेव्हा तुम्ही जे त्याच्याशी वागलात त्याचा कुठलाही राग न मानता तुमचा सद्गुरु तुमच्या जखमेवर फुंकर घालायला, तुम्हांला मलमपट्टी बांधायला तुमच्या मागे उभा असतो.
    जेव्हा मनुष्य सद्गुरुंशी ह्या दोन बाधा टाळून वागतो, त्याच्या चरणांशी ह्या बाधा ठेवतो. तेव्हा ह्य अबाधा त्या मनुष्याच्या आयुष्यात उरतच नाहीत. कारण सद्गुरुंमध्ये व तुमच्यामध्ये दुसरे कुणीही नसते.
    "जिस जिस पथपर भक्त साई का, वहाँ खडा है साई”
    कुणाला वाटते, सद्गुरु व माझ्यामध्ये अनेक जण आहेत कुणासाठी बायको, मुलं जवळची असतात तर कुणासाठी अन्य व्यक्ती. पण खरं सांगू का? ह्यातलम कुणीही तुमचे नसते. तुमचा असतो तो एकच तुमचा सद्गुरु.
    एक उदा. सांगतो एक मनुष्य स्वत:चे घर किती शांत ठिकाणी आहे, जवळ कुठलीही दुकाने नाहीत, म्हणून नेहमी तक्रार करत असे देवाने एक स्तोत्र दिले. ह्यामुळे त्याने नवीन जागा घेतली, एक महिना आनंदाने गेल्यावर परत ह्या मनुष्याच्या त्याच्या सद्गुरुकडे तक्रारी सुरु झाल्या, नवीन जागेत काहीच शांतता नाही म्हणून, मग परत त्याला नवीन स्तोत्र दिले व देवाने कंटाळून त्याला पहिल्या व दुसर्‍या जागेच्या मध्ये म्हणजे जिथे शांतीही नाही व जास्त अशांतीही नाही अशा ठिकाणी जागा दिली व नवीन उपासना दिली तिथे एक महिना आनंदात गेल्यावर परत ह्या मनुष्याच्या तक्रारी सुरु झाल्या, कारण माणसं असून त्या बिल्डिंगमध्ये कुणी एकमेकांशी बोलत नव्हते. परत देवाने मग चौथी उपासना दिली.
    इथे हा मनुष्य प्रार्थना सद्गुरुंची करत होता पण सद्गुरुंच्या शब्दांवर मात्र त्याचा विश्वास नव्हता. ह्या व्यक्तीसाठी त्याचा देव हा फक्त त्याच्या सोयीसाठी होता.
    कुणी माझ्यापुढे जाता कामा नये व स्वत:च्या सोयीनुसार निकष लावणे ह्या गोष्टी सद्गुरुंसमोर थांबवल्या पाहिजेत.
    गुरुपौर्णिमेच्या, त्रिपुरारीपौर्णिमेच्या दिवशी आरामात ९ नंतर खाऊन-पिऊन बरेचजण सोयीनुसार दर्शनाला येतात. त्यासाठी मग लाईनच ९ नंतर थांबवावी लागली. अशी वेळ का येते?
    इथे एक दिवस स्टेजवर बसून बघा आणि सगळ्या गर्दीकडे बघत हात वर करत रहा, १ तास सुद्धा तुम्ही बसू शकणार नाही. तेव्हा तुमच्या लक्षात येईल किती कठीण असते ते.
    देवाकडे स्वत:ची सोय बघणे थांबवा हे कसे थांबवायचे? तर यासाठी सद्गुरुकडे प्रथम सामान्य मनुष्य म्हणून पहा.
    समाधान सेवा म्हणजे गुरुचरणसेवा. ही तीन पातळींवर करता येते -
१)भौतिक पातळी :- म्हणजे स्थूल पातळीवर सद्गुरु मनुष्य रुपात आला आहे म्हणून त्यांची मनुष्य समजून जी सेवा करायची आहे अशी देहिक सेवा, तसेच त्याने जे सांगितले आहे ते आचरणात आणणे.
२)सूक्ष्म सेवा :- म्हणजे त्याच्या मनाची सेवा मानसिक सेवा त्याने (सद्गुरुंनी) सांगितलेली उपासना प्रेमपूर्वक करणे.
३)तरल पातळी :- प्रज्ञेची पातळी. सद्गुरुंचे चिंतन, त्याच्या विचारांचे चिंतन करणे.
४)तुर्या पातळी (अवस्था) :- ही कुठलाही मानव करु शकत नाही.
    संपूर्ण प्राणाने सद्गुरुंची सेवा करायची. सद्गुरुंच्या मूळ अस्तित्त्वाची, त्रिगुणातीत अस्तित्त्वाची स्वत:च्या प्राणाने सेवा करायची.
    आमचं शरीर, मन, बुद्धी एकत्र करुन सेवा करायची, ही आपण करु शकत नाही, कारण तोच (सद्गुरु) अशी आमची सेवा करत असतो. तो सदेह येतो ते ह्या तुर्यावस्थेसाठी तो देहातीत असतो, तेव्हा दिसू शकत नसल्याने मर्यादा येतात. म्हणून मग तो अवतार धारण करतो ते भक्तांच्या सेवेसाठी.
    तुमची सेवा हे त्याच्यासाठी (सद्गुरुंसाठी) अध्यात्म असते. मानवाची सेवा करण्यांसाठी प्रत्येक मानवात असणार्‍या परमेश्वराच्या अस्तित्त्वाची सेवा करण्यासाठीच तो येतो.
    ह्यातील पहिल्या ३ सेवा आपल्याला नीट करता आल्या पाहिजेत. ज्या क्षणाला मी सद्गुरुंना आपले मानतो, त्या क्षणापासून तो तुमची सेवा (तुर्यावस्था) करतोच. म्हणून त्याच्याकडे निकष लावू नका. नंबर लावत बसू नका.
    तुम्ही नंबर लावले की माझ्या डोक्याला ताप होतो. त्यामुळे इतरांचे किंवा स्वत:चेही सद्गुरुंकडे नंबर लावत बसू नका.  
    आजपासून आपण निश्चय करुया की, आपल्याला समाधान सेवा करायची आहे. पहिल्या तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत. चौथी सेवा तोच आपली करत असतो. ह्या सेवा जेवढया अधिक प्रमाणात वाढतील, त्याप्रमाणात असमा व अधान बाधा नाहीश्या होतील व आयुष्यात समाधान येईल. सद्गुरुसेवा म्हणजेच समाधान सेवा. सद्गुरुस जरी तुम्ही खड्डयात पुरले तरी तो तुमच्या जखमेवर फुंकर कशी घालतो, हे आज आपण बघितले ही गोष्ट चिरकालीन सत्य आहे.
    साईबाबांच्या काळात बघा, काहीजण आम्ही शिरडीत कुठे राहतो? बाबांची सेवा कशी करणार? असा विचार करत बसले. ते शेवटपर्यंत कोरडेच राहिले.
    आम्हांला असं आमचं जीवन फुकट घालावयाचे आहे का? आज माझा (परमपूज्य बापू) तुम्हां प्रत्येकाला एक प्रश्न आहे. तुम्हाला तुमचं जीवन सफलपणे जगण्याची इच्छा आहे की नाही? (सगळे हो म्हणतात)
    मग ह्याच्यासाठीच मी इथे आलो आहे, इथे बसलो आहे. ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला स्वत:चे जीवन समर्थपणे जगण्यासाठी समर्थशक्ती देणारे. किरातरुद्र सूक्त तुमच्यासाठी येणार आहे. हे सूक्त कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आहे.
    आज ज्यांनी ज्यांनी उत्तर "हो” दिले आहे, तसेच आज जे इथे नाहीत पण ते तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांचे उत्तरही मी "हो” मानले आहे. आणि जे मुंबईत नाही, त्यांची काळजी तुम्ही करु नका. मी(परमपूज्य बापू) फक्त मुंबईचा नाही. खरं तर मी कुणाचाच नाही आणि मी सगळ्यांचाच आहे. मी जसा भारत , इतर देशांचा तसा पाकिस्तानचा पण आहे. पाकिस्तान मला फार हवाहवासा वाटतो.
    किरातरुद्र मधून मी तुम्हांला सगळं शिकवणार आहे. नुकताच संपन्न झालेला प्रसन्नोत्सव असो,  अंजनामाता वही असो कि, किरातरुद्र असो. ह्या सर्वांचे basis काय? तर सद्गुरु सेवा, सद्गुरुप्रती समर्पणाचा भाव.
    ह्यापुढे आम्ही तुलना करणार नाही. तर आम्ही समाधान सेवा करणार व त्यालाही (सद्गुरुस) समाधान देणार.
    गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला काहीतरी सद्गुरुस द्यावेसे वाटते. जर काही द्यायची इच्छा असेल तर फक्त समाधान सेवा द्या. मग देणार का समाधान सेवा?(सगळे हो म्हणतात) नक्की? (सगळे परत हो म्हणतात)
    "हरि ॐ” ह्या "हरि ॐ” चा एक अर्थ "असेच होवो” असाही आहे.

                                                     !! हरि ॐ !!

Wednesday, June 29, 2011

श्रमि श्रमला श्रीरंग....!---(By Sanjaysinh Gambhir)

भक्ती-सेवा सप्ताहाच्या `वो सात दिन` भावनेतून कोणीही पुण्यातील श्रद्धावान बाहेर आलेले नव्हते किंबहुना कोणालाच बाहेर पडायचेच नव्हते. अशा स्थितीत `गोविद्यापीठम` सेवा जाहीर झाली.कितीजण सेवेला येतील कोणीही अंदाज बांधू शकत नव्हतं..आपण सामान्यच,कारण `त्याचा` अंदाज कोणाला असणार ?  `त्याचा` अंदाजच निराला हेच खरं ...कारण इतिहास घडवला `त्यानं`..! तब्बल आठ  बसेस,खाजगी वाहने आणि रेल्वे असं मिळून जवळपास 500 भक्त-कार्यकर्ते सेवेस उपस्थित...!
नुकताच झालेला भक्ती-सेवा सप्ताह आता mega सेवांचीच सवय करून गेलाय की काय ?
गोविद्यापिठमच्या प्रांगणात प्रवेश केला आणि जाणवू लागलं ते बापू. नंदाई अन सुचितदादाचं अस्तित्व...अगदी ठळकपणे !   स्वप्नीलसिंहांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि थोड्याच वेळात सेवाकार्य सुरु झालं..
अनावश्यक तण काढण्यापासून बंधारा बांधण्यापर्यंत विविध प्रकारच्या सेवांचा समावेश या सेवाकार्यात करण्यात आला होता.
वय वर्षे 5 ते 85 या वयोगटातील सर्व श्रद्धावानांनी उत्साहात आपापल्या शारीरिक कुवतीनुसार या  सेवेत सहभाग घेतला.
गोविद्यापिठमच्या प्रत्येक झाडातून,प्रत्येक पानातून आपला बापू आनंदी चेहऱ्याने सर्वांकडे पाहत होता...नेहमीसारखाच..! तो आपल्याकडे पाहतच असतो. आपण त्याला पाहतो का हे महत्वाचे...प्रत्येक सेवेत असा अनुभव येतो की कामाची सवय  नसलेल्या आम्हाला  इतकं काम करून थकवा कसा येत नाही ? याचं उत्तर एकच...बापू करितो आमुची सेवा ! तो आपला सर्व थकवा स्वतःकडे घेतो,तो दमतो म्हणून आम्ही विना थकवा राहतो..! हा भाव नाहीये मित्रांनो, सत्य आहे...!!  म्हणून आपण `मी सेवा केली `असे न म्हणता `हे बापुराया, मी तुझा शतशः ऋणी आहे, तू मला ही संधी  दिलीस` असं म्हणायला हवंय.
बापूकार्यात एक फायदा असतो,मित्रांनो,आपल्या मनातील जाळी-जळमटे, शंका-कुशंका, तर्क-कुतर्क, रुसवे-फुगवे, पोकळ अहंकार या सर्वांना मूठमाती  दिली   जाते. तशी व्यवस्था बापू यंत्रणेत आहे.पण कधी ? आपण काही करतोय हा विचार येऊ दिला नाही तर.. बापू विश्वनियंता आहे,सर्वव्यापी,सर्वज्ञ आहे. तरीही आपल्या छोट्याशा चांगल्या कृतीचं त्याला खूप कौतुक आहे.
खरं तर त्यानं कौतुक करावं असं खरंच आपण काही करू शकत नाही. भल्या-भल्या ऋषी-मुनींना हजारो वर्षे तपश्चर्या करूनही जो दुष्प्राप्य तो आम्हांस जर खरोखर काहीही न करता लाभला आहे तर आम्ही त्याला हवं तसंच वागायला हवं...!
विश्वव्यापक तूंचि  होसी I ब्रह्मा विष्णू व्योमकेशी I
धरिला वेष तू मानुषी I  भक्तजन तारावया II 
याचं स्मरण आपण कायम ठेवायला हवं.
आपल्या जीवनातील तण (कुविचार) आणि  ताण काढण्यापासून  ते जीवनाला मर्यादेचा बंधारा बांधण्याचं काम बापू    अखंडपणे करत आहेत. आपण चुकतच राहतो,चुका करतच राहतो, बापू मात्र आपल्यासाठी राबतच राहतो,श्रमतच राहतो ..आपल्या चुकांना क्षमा करून !

आपलंआता कर्तव्य आहे की  बापूंना आपल्यामुळे सदैव आनंदी ठेवणं...आपल्या रागाचा अनुराग झाला की आपल्या अरंग जीवनात पांडुरंग प्रकटविण्यासाठी    तो
अनिरुद्ध श्रीरंग समर्थ आहे....!!!   



---By Sanjaysinh Gambhir

Tuesday, June 28, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२३ -०६-२०११)

हरी ॐ
आता आपण दहावी वमनबाधा याचा दुसरा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे तीच चूक परत परत करणे. त्यावेळी आपण त्या चुकीच्या मागील कारणाला ओळखले पाहिजे. त्याचे वमन आपल्याला करता आले पाहिजे. जर करु शकत नसू तर वमनबाधा होते.  मलेरिया, टी.बी. असे आजार/रोग होतात. त्यावेळी जर नीट उपचार करुन त्याचे विषाणू दूर केले नाहीत तर तो आजार आपल्याला परत परत होतो. त्याचप्रमाणे चूक देखील परत परत होते. हीचा व्यय नाही असा कोणी नाही. आणि असेल तर तो ‘संत’ आहे. जर आपल्याकडून झालेली चूक एकदाच घडली परत कधीच त्याने ती चूक केली नाही तर ती व्यक्ति ‘संत’ असते की ज्याच्याकडून कधीच कोणतीच चूक घडतच नाही.
यातही दोन प्रकार आहेत एक म्हणजे ज्याला ती चूक केल्यामुळे पश्चात्ताप होतो/आहे आणि दुसरा म्हणजे ज्याला पश्चात्ताप नाही.

ज्या व्यक्तिला पश्चात्ताप होत नाही तो वमनबाधेत मोडत नाही आणि अशावेळी श्रीगुरुक्षेत्रमंत्रदेखील त्याच्या मदतीला धावून येत नाही. कारण ‘ज्याला बदलण्याची इच्छा नाही त्याला देवपण बदलू शकत नाही.’’ अगदी उपासना करुन जादूटोणा करुन देखील नाही. मनुष्य जर स्वेच्छेने एखादी चूक वारंवार करत असेल तर ती चूकच आहे आणि त्याला त्या बाबतीत त्याला पश्चात्ताप नसेल तर ती बाधा नव्हे पाप आहे.

याउलट जर चुकीचा/चुकीबद्दल पश्चात्ताप असेल तर बाधाप्रशमन श्रीगुरुक्षेत्रमंत्र त्या गोष्टीला (चुकीच्या) दूर करतो. पाप दूर करतो. पण जर पश्चात्ताप असेल तरच श्रीगुरुक्षेत्रमंत्र काम करतो.
माझ्याकडून जे घडतंय ते चुकीचे आहे आणि मी त्यातून बाहेर पडायचा ‘प्रयास’ करतो, अशा वेळी गुरुक्षेत्रमंत्र धावून येतो. (आपल्या मदतीला) तो आपले मन बदलतो, गोष्टी  अशा काही घडवून आणतो की आपण तीच चूक परत करणार नाही. पण ज्यांना पश्चात्ताप आहे, आपली चूक आहे हे मान्य आहे त्यांच्याविषयी /बाबतीच हे घडते.
बापू सांगतात, माझ्या क्लिनिक मध्ये माझ्या टेबलवर माझ्या डाव्या हाताला एक बेल ठेवली होती. एक पेशंट गेल्यावर दुसर्‍या पेशंटला बोलवताना बापू ती बेल वाजवून बोलवायचे. ती बेल काही कारणास्तव खराब झाली  आणि नवीन बेल बसवताना ती उजव्या हाताला बसवली. नवी बेल उजव्या हाताला आहे हे माहित असूनसुद्धा पुढचे काही दिवस नवीन पेशंटला बोलवताना हात पहिले डाव्या बेल वर जायचा ती वाजली नाही की मग दुसर्‍या बेल वर. म्हणजे काय ? तर हात आणि बेलची जागा यांचे कंडिशनिंग झाले होते.

‘कंडिशनिंग’ जेव्हा ‘अ’ नावाची घटना/गोष्ट आणि ‘ब’ नावाची घटना किंवा गोष्ट या सतत एकत्र घडतात, त्यावेळी  मेंदूमध्ये एक वेगळे नवीन सेंटर बनते की ज्यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ चा परस्पर संबंध असतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा २-४ गोष्टी सतत एकत्र घडत राहतात तेव्हा त्यांचे मेंदूमध्ये एक समीकरण तयार होते यालाच कंडिशनिंग  म्हणतात.

एका सायंटिस्टने एक कुत्रा ठेवला आणि एका ठराविक वेळेला एक विशिष्ट /वेगळा बझर लावून तो त्याला त्याचे आवडते खाद्य देत असे. काही दिवसांनी तो फक्त बझर वाजवत असे आणि रिकामी डिश त्याच्यासमोर सरकवत असे त्यावेळी देखील फक्त बझर ऐकून त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ येत असे, नंतर त्याने डिश सरकवणे सुद्धा बंद केले तो फक्त बझर वाजवत असे आणि तेव्हासुद्धा त्या कुत्र्याची लाळ गळत असे. यावरुनच कंडिशनिंग इफेक्ट लक्षात येतो.

आपल्या मनाचे कंडिशनिंग हे आपणच करतो. काही बाबतीत आपले आईवडिल , संस्कार करणे ही गोष्ट चांगली की वाईट, दिवा लावला की नमस्कार करायचा ही सवय. माझ्या देवासमोर दिवा लागला की हात जोडला जातो ही सवय असते.
कंडिशनिंग जे आहे ते स्थळ, काळ, दिशा, वेळ आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून नसते. आणि सवय जर आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असेल तरच प्रकटते. समजा एखादा मुलगा सिगरेट पित असेल आणि त्याचे आईवडिल त्याच्यासमोर असतील, तर ती त्याची सवय असेल तर तो आईवडिलांसमोर पिणार नाही आणि जर का ते कंडिशनिंग असेल तर मात्र तो बिनधास्त ती सिगारेट त्यांच्यासमोर पण ओढेल.

‘‘सवयीपेक्षा कंडिशनिंग’ तीव्र असते. कंडिशनिंग मनुष्याला निर्लज्ज बनवते. त्याला स्थळ, काळ, वेळ बघायची गरजच भासत नाही. सवय आपण बंद करु शकतो.
तर बापू हे कसं काय ?

जर एखादा मनुष्य दारु पितो, दररोज एक पेग- त्याचा संबंध दुःख किंवा आनंदाशी नाही तर सवय. 
पण ज्याक्षणी तो डोक्याला शांती मिळते, दुःख विसरल जातं, आनंद व्यक्त करता येतो म्हणून पितो ते कंडिशनिंग - त्यामुळे व्यसन लागते. सुटणारी ती सवय आणि न सुटणारी- कंडिशनिंग / व्यसन आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट सुधारायची किंवा नाही ‘इट डिपेंडस ऑन कंडिशनिंग’.

मोठ्यातला मोठा कंडिशनिंग मधून बाहेर यायला कंडिशनिंग च मदत करते.
निगेटिव्ह कंडिशनिंग चुकीचे. पॉझीटिव्ह कंडिशनिंग चांगले. की जे वाईटातून बाहेर पडायला मदत करते.
जर व्यक्ती दुःख विसरण्यासाठी किंवा चांगली ऍक्टिंग करतो म्हणून दारु/सिगरेट पित असेल त्यावर डिपेंडंट राहत असेल म्हणजे व्यसनी बनत असेल आणि जर त्याला त्यातून बाहेर पडायचे असेल तर त्याचे ऍक्टिंग दुसर्‍या गोष्टीबरोबर जोडले पाहिजे. दारु पिण्याने माझी ऍक्टिंग चांगली होते तर त्याने दारु प्यावी पण त्याबरोबर स्वतःच्या मनाने एखादे स्तोत्र म्हणावे की हा अमुक स्तोत्र बोलल्यावर माझी ऍक्टिंग चांगली होते. हळूहळू ती व्यक्ति पाच पेग दारु ऐवजी चार पेग आणि एकदा स्तोत्र पठण, तीन  पेग आणि दोन वेळा स्तोत्र पठण असे करत करत स्तोत्रांची संख्या वाढवत न्यायची  आणि पेगची संख्या कमी करत न्यायची. असे केल्याने त्याच्या मेंदूमध्ये पठणाचे नवीन केंद्र तयार होईल आणि त्याचे ऍक्टिंग चे केंद्र स्तोत्र पठण केंद्राशी जोडले जाईल. दारुच्या केंद्राची सत्ता कमकुवत होईल व पठणाच्या केंद्राची सत्ता वाढेल.
कंडिशनिंग वाईट किंवा चांगले हे आपल्यावरून ठरते. ती गोष्ट आणि माझे रिलॅक्सेशन (निवांतपणा) आपल्या नकळत चूक आणि रिलॅक्स होणं यांचं कंडिशनिंग होते.

आपण जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा त्याचे ३ टप्पे असतात,
जेव्हा चूक घडत असते ती वेळ,  चूक करायच्या आधीची वेळ, आणि चूक केल्यानंतर,  हे ते तीन टप्पे.
त्यामध्ये पहिले चूक होऊ नये म्हणून आपण टेन्शन घेतो (चूक करायच्या आधीची वेळ).
चूक करताना रिलॅक्स असतो (चूक घडत असते ती वेळ).
आणि चूक केल्यानंतर पुन्हा आपण टेन्शन घेतो.

समजा १२ तास आपण उदाहरणादाखल घेतले व ह्याचे ३ टप्पे केले (४तास + ४ तास +  ४ तास)

त्यामध्ये पहिला आणि शेवटचा पिरिअड टेन्शन असते (४ तास + ४ तास) आणि चूक करताना रिलॅक्स पिरियड असतो (४ तास). रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले जागृत मन झोपते पण अंतर्मन मात्र विचार करत असते ते जागृत असते.
आणि अशा या अंतर्मनाला रिलॅक्सेशन आवडतं आणि ते तेच धरुन ठेवते.  अंतर्मनाच्या दृष्टीने आपण एकाच गोष्टीमुळे आठ तास टेन्शन आणि चार तास रिलॅक्स झालेलो असतो. अशावेळी अंतर्मन जेवा आपण रिलॅक्स (निवांत) झालेलो ते ४ तास धरून ठेवते व त्याचे केंद्र वाढवते (म्हणजेच चुकीचे केंद्र) आणि ते ‘चुकीच्या’ केंद्राशी जोडले जाते. 
तसेच चूक घडण्याआधी व चूक घडल्यावर आपल्याला जो पश्च्त्ताप होतो व टेन्शन येते (४ + ४ = ८ तास) ह्या वेळात आपण निवांत नसतो, म्हणून अंतर्मन ह्या केंद्राला (चूक ना करण्याच्या केंद्राला) कमी ताकद पुरवते म्हणजेच हे केंद्र लहान बनते.
आणि मग साहजिकच चूक न करणार्या केंद्राची ताकद कमी झाल्याने  चुकीचे केंद्र (चूक करण्याचे केंद्र)  आपल्या बाह्या मनाला भारी पडते, आणि परत परत चुका होतच राहतात.


तर अशी वेळी काय करावे?

चूक घडण्याआधीचे ४ तास टेन्शन घेण्याऐवजी स्थळ बदला, देवळात जा, ते नसेल करायचं तर पिक्चरला जा, सार्वजनिक ठिकाणी जा, मोहाच्या ठिकाणी राहू नका.
समजा तुम्ही ऑफिस मध्ये आहात. एकच रुम आहे आणि तुम्ही दोघंच आहात, बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळी  ती चूक केल्यामुळे आपल्या पत्नीला किती वाईट वाटेल याचा विचार करा  म्हणजे चूक केल्यानंतरचे चार तास उगाळा. आणि जर का चूक घडली (त्यातूनपण) तर पहिले चार आणि नंतरचे चार तास अशी डबल केंद्रं मनामध्ये तयार होतात. आणि त्यामुळे अंतर्मनात चूक केल्यामुळे टेन्शन निर्माण होते.


चांगली माणसे चूक घडू नये म्हणून प्रयत्न करत असतात पण त्यांचे अंतर्मन त्यांना दुर्बल करते.     
मी चूक केली हे कुणाला कळलं नसलं तरी माझ्या देवाला ते कळतं.
चूक करण्याआधीचे चार तास तो माझ्यावर रागवला होता.
मी चूक करत असताना तो संतापलेला आणि त्याला दुःखही होत होतं आणि चूक झाल्यानंतर त्याला माझ्याविषयी सहानुभूती देखील असते.


चूक करताना सद्गुरुचे नामस्मरण करा. माझं (प.पू.  बापूंचे) नाव घ्या.तुमची चूक करण्याची वृत्ती कमी होईल आणि चांगली वृत्ती दहा पट वाढेल. तोच माझा (बापूंचा) धंदा आहे. प्रेमाने मला जे मान्य आहे ते बोलतो. ‘‘तुम्ही सामान्य माणसे आहात, तीच चूक वारंवार करत असताना, घडत असतांना, ती ओझी वाहताना मला सोबत घ्या.’’
अंतर्मन त्या सद्गुरुच्या ताब्यात द्या.
चूक करताना जेव्हा आपण ‘साई , साई’ असे म्हणतो त्यावेळी आपल्या मनामध्ये ‘साई’ नावाचे केंद्र तयार होते आणि दारु पिण्याची इच्छा होत नाही.
पण सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका. रुप जरी त्याचे असले तरी त्यांची कार्य वेगळी आहेत.
‘जिस जिस पथ पर भक्त साई का, वहॉं खडा हैं साई’
तुम्ही कुठेही जाता तिथ तिथे तुमचा सद्गुरु आधी उभा असतो. तुम्ही जेव्हा पाप करताना देवाचे नाव घ्याल तेव्हा सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या. त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका कारण त्या रुपाकडे तेवढ्या प्रमाणात क्षमा नसेल. अकारण कारुण्य जेवढे सत्गुरुंकडे असतं तेव्हढ दुसर्या कुणाकडेही नसतं.

आम्ही पाप केले तर आमच्या सद्गुरुला दुःख होतं आणि जर पाप करताना त्याचे नाव घेतले तर त्याला दुःख होत नाही. ‘माझ लेकरु सुधरतयं मलाही जरा प्रयत्न करु देत’ असे त्याला वाटते.
ज्यावेळी आपल्या मनाला पश्चात्ताप होतो त्यावेळी आपला वाईट कंडिशनिंगशी संबंध संपतो.
चांगल्या माणसावर वाईट कंडिशनिंग लवकर होते तर चांगले कंडिशनिंग उशीरा होते. वाईट माणसाला कंडिशनिंग होत नाही ते सर्व दिखावे असतात.

आपल्या अंतर्मनावर जर (अंतर्मनात) परमात्मा असेल (नाम) असेल तर आपले बाह्यमन कंट्रोल मध्ये रहाते.
आपण जेव्हा प्रार्थना-आमंत्रण करतो, त्यावेळीच तो परमशिव आपल्या मनामध्ये येतो ते ही आपले आमंत्रण आहे तेवढ्यापुरतेच आणि तोपर्यंतच राहतो. त्याला पूर्णपणे शरणागत जा, तो कायमचा तुमच्या मनात राहतो.

श्रीसाईसच्चरितामध्ये एका कथेत सांगितल्याप्रमाणे एक म्हातारी साईबाबांकडे गुरुमंत्र द्या म्हणून उपोषण करते. बाबा तिला म्हणतात,‘‘काय गं आई? माझ्या गुरुने माझे कान फुंकले नाहीत तर मी काय फुंकू? तु माझ्याकडे अनन्य भावाने बघ, मी तुझ्याकडे बघेन त्याच भावाने.’’

सद्गुरुकडे प्रेमाने बघा, तुम्ही ज्या भावाने बघाल, तो त्या भावाने तुम्हाला बघेल. जर वाईट दृष्टीने बघितलं तर तो डोळे बंद करुन घेतो. त्याला काही फरक पडत नाही.
बघण्याचे प्राबल्य त्यालाच आहे ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे.

आदिमाता परमात्म्याला सृष्टीचक्र आणि संहारचक्र घेऊन अवतार घ्यायला लावते.
१) राम - १०८% सृष्टीचक्र घेऊन आला आणि आवश्यकतेपुरते संहारचक्र वापरले. म्हणजेच सृष्टीचक्र प्रधान आणि संहारचक्र गौण  (उपांग)
२) परशुराम - संहारचक्र (प्रथम कालखंड) आणि सृष्टीचक्र (नंतरचा कालखंड)
३) कृष्ण - संहारचक्र (प्रधान) आणि सृष्टीचक्र (उपांग)

पण तोच परमात्मा जेव्हा सद्गुरुच्या (साई) रुपात अवतरित होतो तेव्हा ती आदिमाता त्याला दोन्ही चक्रांच्या सहीत पाठवते म्हणजेच ..........
त्याच्या उजव्या हातात सृष्टीचक्र तर डाव्या हातात संहारचक्र
उजव्या पायात संहारचक्र तर डाव्या पायात सृष्टीचक्र.
म्हणजेच त्याला पाहिजे आणि हवे तसे ‘तो’ (सद्गुरु) काळानुसार घटनेनुसार त्याचा वापर करतो. त्याच्या प्रत्येक वागण्यात, चालण्यात, हातवार्‍यांमध्ये भाव असतो आणि त्याचे कारण वेगवेगळे असते. त्याच्याकडील सृष्टीचक्र हे त्याच्यावर प्रेम करण्यांसाठी चांगल्याची निर्मिती करते, तर संहारचक्र वाईट गोष्टींचा नाश करते.

म्हणूनच सद्गुरुच्या पादुका नेहमी पूज्य असतात. त्याचे पादुकापूजन आपण करतो. त्याला आमंत्रण देतो.
तो आपल्या डाव्या पायाने चांगल्याची निर्मिती करतो तर उजव्या पायाने वाईटाचा नाश करतो.
आदिमाता परमात्म्याला का पाठवते? (सद्गुरु रुपात)
कारण - परत परत तीच चूक करणे हा परमात्म्याचा गुणधर्म आहे म्हणूनच युगानुयुगे लोटली तरी वाईट माणूस सुधारेल म्हणून तो क्षमा करतो आणि त्याचे परिमार्जन ते सर्व दुरुस्त करण्यासाठी- ती आदिमाता सद्गुरुतत्त्वाची निर्मिती करते.


तो क्षमा करत राहतो म्हणून आई सद्गुरुतत्त्वास दोन्ही चक्रे घेऊन पाठवते. जो सद्गरुतत्त्वाचा आश्रय घेतो. त्याच्या  आयुष्यात सद्गुरु नेहमी हात व पाय यांसहित कार्य सुरु करतो. हे करण्यासाठीच .......
बाबा सांगतात,‘‘तू माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघेन  .......................
परमात्मा चूक करतो पण भल्यासाठी.
आईच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन तो क्षमा करतो म्हणून त्याला परत परत यावं लागतं.
‘‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्’’
म्हणूनच आम्हाला घट्टपणे सद्गुरुतत्त्वाचे चरण, हात , नितांत श्रद्धा आणि प्रेमाने धरुन ठेवले पाहिजेत.
हरी ॐ

Monday, June 20, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (१६-०६-२०११)

हरी ॐ
प्रवचनाच्या आधी प.पू.बापुंनी पंचशील तृतीया परिक्षेचा निकाल सांगितला.
आता खरोखरच जोर जोरात टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट सांगणार आहे. मागच्या वेळेस रामनाम बँकेचे अकाऊंट सांगितले होते त्यामध्ये एक नाव सांगायचे राहुन गेले होते. ते म्हणजे आपल्यातल्याच एक भगिनी दक्षावीरा ह्यांच्या एकुण ११५१ वह्या आतापर्यंत पुर्ण झाल्या आहेत. 
 साध्या गृहिणी प्रमाणे सगळे काम करत करतच त्यांनी ह्या वह्या लिहिल्या आहेत. आता इथल्या प्रत्येकाने ह्या ११५१ भागिले आपल्या वह्या असे गणित करायचे आणि जे उत्तर येईल ते स्वत:च्या घरात भिंतीवर लावून ठेवा, म्हणजे स्वप्नातसुद्धा रामनामाची वही येईल !!! 
आज प्रथम एक अतिशय महत्त्वाची सुचना आहे ती म्हणजे पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमा येतेय. कधी आहे? १५ जुलै शुक्रवारी, बरोबर आतापर्यंत भक्तांनी वेळोवेळी लिहिलेल्या चिठ्ठया मी ( प.पू.बापू) वाचतोय तेव्हा बर्‍याच जणांनी लिहिलेले होते की आम्हांला त्रिपुरारी पौर्णिमेला सुट्टी असते पण गुरुपौर्णिमेला सुट्टी नसते. मागे एकदा आपण हा उत्सव काही दिवस पुढे शिफ्ट केला होता. ह्यावेळी आपण एक दिवसाने पुढे शिफ्ट केला आहे म्हणजे १६ जुलैला, शनिवारी आपण गुरुपौर्णिमा इथेच साजरी करणार आहोत.
ह्यावर्षीपासुन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही नवीन गोष्टी add  करणार आहोत. त्याम्हणजे,
१) दरवर्षी आपण गजर करत इष्टिका घेऊन प्रदक्षिणा घालतो तो मधला स्तंभ ह्या वेळेपासुन वेगळा बनवलेला असेल. ह्या स्तंभाला तीन बाजु असतील एका बाजुला डॉ. अनिरुद्धसिंह जोशी, दुसर्‍या  बाजुला डॉ.  नंदावीरा जोशी तर तिसर्‍या बाजुला डॉ. सुचितसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या प्रतिमा असतील व त्या स्तंभाच्या वर मध्यभागी कमळ असून त्यात माझ्या (प.पू.बापू) मूळ सद्‌गुरुंच्या पादुका असतील परंतु त्या बंदिस्त असतील त्याचं दर्शन कोणाला घेता येणार नाही आणि त्या पादुकांच्याच शेजारी एका बाजुला पुर्वा अवधुत (१ला कुंभ) व दुसर्‍या बाजुला अपुर्वा अवधुत(२४वा कुंभ) असतील.
 श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवात जे volunteer कुंभ डोक्यावर घेऊन फिरले ते पाहुन भक्तांमधुन विचारणा झाली होती की, आम्हांला ह्याचा लाभ कधी मिळणार? तर आता ह्यापुढे दर गुरुपौर्णिमेला ह्या दोन्ही कुंभाभोवती प्रत्येक भक्तांस प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळणार आहे. पुर्वावधुत कुंभ (१ला कुंभ) व अपुर्वावधुत कुंभ (२४वा कुंभ) हे दोन्ही सर्वांत श्रेष्ठ असे सिद्ध केलेले कुंभ आहेत व त्यासोबत माझ्यासाठी (प.पू.बापू) श्रेष्ठ अश्या माझ्या गुरुंच्या पादुका ह्या दोन्हींचा लाभ प्रत्येक भक्तांस मिळणार आहे.
२) ह्या वर्षीपासुन आमच्या घरातील (प.पू.बापू)  नृसिंह सरस्वतींच्या मुळ पादुकांचे दर्शन प्रत्येक भक्तांस गुरुपौर्णिमा उत्सवस्थळी घेता येईल.
३) तसेच जो त्रिविक्रम इथे दर गुरुवारी असतो त्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुजन देणगी मूल्य भरुन प्रत्यक्ष पुजन करता येईल. देणगी मूल्य रुपये ५०१/- व रुपये १००१/- असे असणार आहे ज्याला जे जमेल ते पूजन श्रद्धावान करू शकतो.
४) आता ४ थी गोष्ट मांडायची आहे, जर तुम्हांला ही गोष्ट मनापासुन पसंद असेल तर हो म्हणा, तुम्ही हो म्हटलं तर हा ठराव मंजुर होणार आहे नाहीतर नाही आणि ही गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी (प.पू.बापू) मुंबईच्या बाहेर. ( सगळेजण नाही म्हणतात) .
 अरे, मी मुंबईच्या बाहेर जाणार नाही असे म्हणत होतो पण आता तुम्ही नाही म्हणालात म्हणजे मग मला आता जावे लागणार. !! काळजी करु नका, मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुंबईतच असणार आहे. 
बघा प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या ३ दिंड्या असतात तर ह्या ३ दिंड्यांचा उपयोग मी (प.पू.बापू) भक्तांच्या रांगेमधुन म्हणजेच भक्तीगंगेमधुन फिरवण्यासाठी करायचे ठरवले आहे. ह्या दिंड्या भक्तीगंगेमधुन फिरताना त्यांच्या सोबत पालखी असेल आणि त्या पालखीमध्ये पदचिन्हे असतील. त्या पदचिन्हांवर प्रत्येकाला डोके ठेवुन, हात ठेवुन नमस्कार करता येईल. ही पदचिन्हे direct पालखीतुन तुमच्या प्रत्येकाकडे पोचतील. फक्त तिथे (पदचिन्हांवर) फळ, फुल, पान, दगड, चिखल असलं काहीही वाहायला परवानगी नाही. वाहायचेच असेल तर फक्त तुमचे प्रेम वाहा वाटल्यास तुमचे पाप सुद्धा वाहा. मनापासुन तुम्ही तुमचे पाप इथे वाहिले ना, तर आपोआप माझे काम कमी होईल. ह्या पदचिन्हांवर डोक ठेवायची, नमस्कार करण्याची कोणालाही अजिबात  जबरदस्ती नाही. 
आधी प्रत्येकाला हात लावुन, डोक ठेवुन नमस्कार करता यायचा पण आता वाढत्या गर्दीमुळे फक्त दुरुनच नमस्कार करायला मिळतो. पण आता ह्यापुढे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पदचिन्हाद्वारे direct नमस्कार करण्याचा आनंद प्रत्येक भक्ताला प्राप्त होणार आहे. ह्या पदचिन्हांशेजारीच श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पाद्यपुजन करतानाचे जल म्हणजेच अभिषेक जलाचा गडू ठेवण्यात येणार आहे. 
गुरुपौर्णिमेला सकाळी आल्यावर प्रथम मी (प.पू.बापू), नंदाई, व सुचितदादा श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे गुरुगीतेची CD चालु असताना पुजन करु. ह्या पुजनाच्या वेळचे तीर्थ पदचिन्हांशेजारी असेल. कसा वाटतो हा ठराव? मंजुर आहे ना सगळ्यांना? (सगळे हो म्हणतात) मग कायद्यात रुपांतर केले तर चालेल ना? नक्की. ओके. 
तर आता आपल्याला पुढची बाधा बघायची आहे. कितवी बाधा? १० वी. ती म्हणजे वमन बाधा. वमन म्हणजे उलटी, vomiting. मग उलट्या होणे म्हणजे बाधा म्हणायची का? नाही. तर वमन बाधा ही एकंदर ६ प्रकारची आहे. 
आपण म्हणतो ना ह्याला ओकल्याशिवाय बरं वाटत नाही. त्याने गरळ ओकून मनातले विष बाहेर टाकले. ह्याचा अर्थ काय तर जे उलटी होण्याजोगे असे शरीरात किंवा मनात दाह निर्माण करणारे बाहेर टाकले जाते. अशी वमन बाधा म्हणजे जिथे राग, द्वेष, संताप व्यक्त व्हायला पाहिजे तिथे होत नाही व हा राग अयोग्य ठिकाणी अयोग्य मात्रेत बाहेर टाकला जातो. ह्यालाच १ ला प्रकार म्हणतात - क्रोध वमन बाधा.
उलटी करताना जर मनुष्य शुद्धीवर नसेल तर अश्यावेळी अन्ननलिकेतुन बाहेर टाकायची गोष्ट श्वास नलिकेतुन आत जाण्याची शक्यता असते म्हणजेच Aspiration pneumonia होऊ शकतो. म्हणुन स्वत:च्या शरीराला त्रासदायक गोष्ट योग्य प्रकारे बाहेर टाकणे अत्यंत आवश्यक असते. 
जेव्हा अपचनाचा त्रास होतो तेव्हा घशात बोटे घालुन पोटातील घाण उलटी करुन बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतो. जोपर्यंत अशी त्रासदायक घाण बाहेर टाकली जात नाही तोपर्यंत पोटाला शांतता मिळणार नाही. ही घाण बाहेर न पडणे म्हणजे वमन बाधा. म्हणजे मनुष्याचे चांगले गुण express न होणे म्हणजे वमन बाधा. आपण इथे कपटी माणसांचा नाही तर सर्व सामान्य चांगल्या माणसांचा विचार करतो आहोत. 
उलटी मध्ये काय होते तर जठर आकुंचन पावते व त्यामुळे नको ते अन्न वरच्या दिशेने ढकलले जाऊन अन्न नलिकेतुन बाहेर टाकले जाते. परंतु ही गोष्ट फक्त स्थानिक (local) भागापुरता मर्यादित नाही तर आपल्या मेंदुशी देखील संबंधीत आहे. आपल्या मेंदुत एक vomiting center असते. तुम्ही बघितले असेल मांजरी किंवा कुत्री पोट बिघडले असेल तर एक विशिष्ट गवत खातात त्यामुळे ताबडतोब उलटी होते व पोट साफ होते. प्राण्यांकडे वासाचे केंद्र strong  असते. त्यामुळे ते गवत वासावरुन ओळखु शकतात. पण माणसाचे तसे नसते. मनुष्याकडे काय आहे तर एक वमन केंद्राप्रमाणे एक खोकल्याचेही केंद्र मेंदुत आहे. आपल्या मेंदुतुन १२ nerves  निघत असतात त्यांना  cranial nerves  म्हणतात. त्यापैकी १० वी nerve ही सगळ्यात मोठी व लांब असते तिला vagus nerve म्हणतात. 
ही नस हृदयापर्यंत तसेच ह्रदय व पोट ह्यांना seperate करणारा पडदा पार करत पुढे पोटापर्यंत जाते. ही नस अशी आहे कि ज्यात ज्ञान केंद्रे पण असतात. अतिशय विलक्षण अशी ही नस पोटाच्या वरती शमन करण्याचे काम करते तर पोटाच्या पडद्याच्या खाली दमन करण्याचे  acidity secretion आम्ल वाढवण्याचे काम करते. आपल्या शरीरातील हे vagaus center शरीरातील सर्व प्रमुख क्रिया म्हणजेच खोकला, उलटी, ह्रदयाचे ठोके, आम्ल वृद्धी अश्या सर्व क्रिया manage  करते. हे केंद्र उलटीच्या केंद्राशी सर्वांत जास्तपणे जोडलेले असते.  
आपल्या शरीरात दोन संस्था असतात त्या म्हणजे central nervous syatem आणि autonomic nervous system. ह्यात autonomic nervous system चे दोन subdivison आहेत ते म्हणजे Sympathetic nervous system व Parasympathetic nervous system. Vagus nerve (नस) ही parasympathetic nervous system मधली main nerve आहे. ही नस माणसाच्या मेंदुमधल्या निरनिराळ्या भावनांच्या केंद्राशी जोडलेली असते. सगळयात जास्त क्रोधाच्या केंद्राशी हीचा अतिशय जवळचा संबंध असतो. ह्यांचा संबंध २ way असतो म्हणजे Vagus nerve चे कार्य वाढले की क्रोध वाढतो व क्रोध वाढला की Vagus nerve चे कार्य वाढते. 
वमन होण्यासाठी ह्या Vagus nerve व cough centre चे एकत्रित कार्य होणे आवश्यक असते. ह्या वमनामध्ये पोटासोबत मनातील नको असलेल्या गोष्टींच्या वमनाचाही समावेश आहे. मनामध्ये जर सगळे साठवुन ठेवले आणि जर व्यक्त नाही केले तर मग सतत चिडचिड करत ते रागाच्या रुपाने बाहेर पडत असते. 
जेव्हा मनात राग आहे, निचरा झाला आहे पण बाहेर टाकता येत नाही तेव्हा समजायचे की आपल्याला वमन बाधा झाली आहे . 
ग्रंथराज मध्ये आपण पहिले की आपल्या शरीरामध्ये ३ नाड्या आहेत  ईडा, पिंगला व सुषुम्ना. ह्यामधली सुषुम्ना नाडी ही गुप्त असते. सुषुम्ना नाडीचा सगळ्यात जवळचा संबंध हा कुंडलिनीशी असतो. कुंडलिनी माता म्हणजेच अंजना माता व तिचा पुत्र म्हणजे हनुमंत म्हणजेच स्वधेचा पुत्र हा खेळत असतो तो सुषुम्ना नाडी मध्येच. ह्या सुषुम्ना नाडीचा संबंध vagus nerve सोबत असतो. 
ह्याचा अर्थ आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील वमन केंद्र हे अंजना मातेच्या व महाप्राणाच्या हातामध्ये असते. आपण गंगा, यमुना व सरस्वती हा त्रिवेणी संगम बघतो. ह्यातली सरस्वती ही लुप्त असते. का? तर सरस्वती म्हणजेच सुषुम्ना नाडी. सुषुम्ना नाडी ही लुप्त असते. आपल्या शरीरातील vagus nerve व हनुमंताचा, महाप्राणाचा संबंध तुटणे म्हणजेच सरस्वती लुप्त होणे. म्हणुन हे हनुमंताशी तुटलेले connection जोडायला हवे. 
"दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते..." जेवढा महाप्राणाशी सबंध जास्त तेवढा क्रोध कमी तर जेवढी वमन बाधा जास्त तेवढा मनुष्य तापट बनत जातो .
मनुष्याने किती चिडावे ह्याचे प्रमाण याज्ञवल्क ह्यांनी अतिशय सुंदरपणे मांडले आहे. कात्यायनी व मैथीली ह्या याज्ञवल्कच्या दोन पत्नी. याज्ञवल्कचे प्रमाण बघण्याआधी त्यामागची छोटीशी गोष्ट समजुन घ्यायला हवी. याज्ञवल्कने जेव्हा हे प्रमाण सिद्ध केले तेव्हा ते त्याच्या गुरुला पटले नाही. तेव्हा गुरुने त्यास माझी सर्व विद्या परत कर असे सांगितले. विद्या कशी परत करणार  असा प्रश्न याज्ञवल्कला पडला तेव्हा तिथे सुर्य नारायण प्रगटले व त्यांनी त्यास वमन करण्यास सांगितले. त्या वमनामधुन याज्ञवल्कने गुरुंची सर्व विद्या परत केली. आता याज्ञवल्कची पुर्ण विद्या गेल्यामुळे तो अज्ञानी झाला तेव्हा सुर्यनारायणाने त्यास सोबत येण्यास सांगुन त्यास ब्रम्हज्ञानाची प्राप्ती करुन दिली.
याज्ञवल्कने  वमनातुन ज्ञान  टाकले हे जाणुन त्याची पत्नी कात्यायनीने प्रश्न केला की, मानवाने किती वेळा वमन करावे? ह्यावर याज्ञवल्कने अतिशय सुंदर उत्तर दिले की, " परमेश्वराने ह्या जगात पाठवताना तुमचा श्वास व तुमचा क्रोध ह्याचे समीकरण करुन पाठविलेले असते. हे कसे? तर व्यस्त प्रमाणात म्हणजेच जर क्रोध जास्त तर श्वास संख्या कमी व जर श्वास संख्या जास्त तर क्रोध कमी. म्हणून लक्षात ठेव की क्रोध हा माणसाला उंदराप्रमाणे कुरतडत असतो, म्हणून मी जितक्या वेळा इतरांवर चिडेन त्याच्या दुप्पट वेळा मला स्वत:वर चिडता आले पाहिजे. "
 जेव्हा मी असे करेन तेव्हाच माझे vagus nerve व सुषुम्ना नाडीचे connection  कायम राहिल. म्हणजे जर तुम्ही दुसर्‍यावर ३ वेळा चिडलात तर स्वत:वर ६ वेळा चिडायला हवे. पण असे होते का? नाही. म्हणुनच connection तुटते. नेहमी दुसर्‍याकडॆ बोट दाखवताना लक्षात ठेवा स्वत:कडॆ 3 बोटे असतात. आपण स्वत:वर चिडण्याचे प्रसंग अनेक असतात पण आपण स्वत:वर चिडत नाही, आणि राग दुसर्यावर काढत राहतो. जेव्हा तुम्ही स्वत:च्या चुका सुधारण्यासाठी स्वत:वर चिडता तेव्हा तुम्ही एवढे समर्थ होता की, आपोआप तुमच्या रागाला तुम्ही control करु शकता. 
मग ह्यासाठी मापदंड काय? तर सोपे आहे दुसर्‍यावर जेवढ्या वेळा चिडणार त्याच्या डबल स्वत:वर चिडले पाहिजे. आपण कोणावर चिडालो की लगेच स्वत:वर चिडायचे, ह्यामुळे स्वत:ची improvement करण्याची ताकत, स्वत:चा aura  एवढा वाढतो की समोरची व्यक्ती काही करु शकत नाही. असे जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपोआप महाप्राणाशी तुटलेले contact जुळते. महाप्राणाचे कार्य काय तर अभ्युदय घडवुन आणणे आणि हे तुटलेले contact जुळण्यासाठी मापदंड कुठला तर दुसर्‍यावर एकदा चिडलो तर स्वत:वर डबल चिडणे. 
ह्याचा अर्थ स्वत:ला मारत बसायचे असे नाही, असला वेडेपणा करायचा नाही. स्वत:वर चिडणे म्हणजे अंर्तमुख होणे. माझे काय चुकले? माझ्या लोभामुळे माझ्याकडुन चुक झाली का? ह्याचा अभ्यास करणे. स्वत:ची चुक कबुल करायला शिकले पाहीजे, चुक घडल्यावर जागच्या जागी देवाची क्षमा मागायला शिका. दुसर्‍यावर रागवल्यावर देवा मला मार्ग दाखव असे सांगा. आपण इथे दर गुरुवारी सुखसावर्णि करतो किती जण बसले आहेत इथे सुखसावर्णिला? हात वर करा. बापरे ६०% लोकांना सुखसावर्णि माहित नाही. भयानक गोष्ट आहे.
मी मागे प्रवचनात सांगितले होते प्रत्येकाच्या सद्‌गुरुंचे प्रतिक म्हणजे त्रिविक्रम. सुखसावर्णि मध्ये आपण काय प्रार्थना करतो तर " त्रिविक्रम दयां कुरु, कृपां कुरु, क्षमां कुरु, मार्गं दर्शय... "
म्हणजे त्रिविक्रमासमोर बसुन काय करायचे तर दया कर, क्षमा कर सांगायचे. इथे माफी मागायची, मन्नत मागायची की अमुक गोष्ट झाली तर अमुक अमुक देईन व हा नवस नंतर गुरुक्षेत्रम किंवा जुईनगरला जाऊन फेडायचा.
मागे कुणी तरी जुईनगरच्या होमाविषयी अफवा पसरवली होती की, तिथे आधी चिठ्ठी लागते तर असे काहीही नाही. तिथे कुणीही बुकिंग करुन होम करु शकतो. तिथे कोणाच्याही चिठ्ठीची आवश्यकता नाही. 
सुखसावर्णि म्हणजे काय तर confession box. आपला कबुलीजवाब देण्याची जागा. ह्याच्या समोर आपल्या चुकांची कबुली द्यायची. म्हणुन आपण इथे प्रार्थना करतो मार्ग दाखव. आमचं मागणं आणि कबुलीजवाब देण्याचे हक्काचे स्थान म्हणजे सुखसावर्णि. आमच्या आयुष्यातील सर्व बाधांचे क्षमन करण्याची ताकत ह्या गुरुक्षेत्रम मंत्रामध्ये आहे. आणि त्रिविक्रम आहे कुठे? तर गुरुक्षेत्रम्‌ मध्येच. त्याच्यासमोर बसुन चुकांचा कबुली जवाब देण्याची, क्षमा मागण्याची प्रार्थना म्हणजेच सुखसावर्णि. तुम्ही जेव्हा मनापासुन पापांची क्षमा मागता तेव्हा तो क्षमा करतो, पण सतत आपल्या चुका उगाळत बसुन स्वत:ला दोष देऊ नका ते त्याला आवडत नाही. 
सुखसावर्णिद्वारे त्या त्रिविक्रमाकडे मागणं मागणे म्हणजे आपला संबंध त्या त्रिविक्रमाशी जोडणे. मग मनुष्याच्या मनाचा संबंध हनुमंताशी, महाप्राणाशी जोडण्य़ाचे काम हा त्रिविक्रम करतो. गुरुक्षेत्रम्‌ मंत्रामध्ये हनुमंताचे नाव दोन वेळा येते. हनुमंत हा रामाचा प्राण असल्याने तो त्रिविक्रम रामच मनुष्याच्या मनाचे connection  हनुमंताशी जोडुन देऊ शकतो.
आज आपण वमन बाधा बघितली. ह्यापुढे आपण एकच चुक परत परत करतो म्हणजे काय? ही कुठली बाधा आहे, तिचे नाव आपण पुढच्या गुरुवारी बघणार आहोत. आज पहिल्या वमन बाधेचा उपाय बघितला. इथे एक रहस्य सांगतो जो उपाय पहिल्या वमन बाधेचा आहे तोच इतर सर्व बाधांचाही आहे. सगळ्याचा उपाय एकच तो म्हणजे कुंडलिनीचे, महाप्राणाचे आपल्याशी connection जोडुन ठेवणे.  
हे कसे होते तर जेव्हा सद्गुरुंवर नितांत श्रद्धा असते तेव्हाच.
"एक विश्वास असावा पुरता , कर्ता हर्ता गुरु ऎसा.."
एक मनापासुन सांगतो राजांनो, तुम्ही जरी कुर्‍हाड घेऊन हे connection जोर लावून तॊडण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुम्ही एकदा जरी कळवळीने, मनापासुन तुमच्या सद्‌गुरुंवर प्रेम केले असेल, त्यांना नमस्कार केला असेल तरी तो मग तुमच्या मागुन तुमच्याही नकळत हे तुटलेले connection जोडुन देतो व तुमच्या हातातील कुर्‍हाडीचे कमळ करतो. ही ताकद फक्त सद्‌गुरु तत्वामध्येच असते. हे मी (प.पू.बापू) माझ्या सद्‌गुरुंच्या अनुभवावरुन सांगतो. ज्यावेळी हे connection जोडले जाते तेव्हा आपोआप कुर्‍हाडीचे कमळ झालेच म्हणून समजा. 
वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या महिन्यात हनुमान चलिसा maximum म्हणा.  
कारण "श्रीगुरु चरनरज सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी .." मुकुरू म्हणजे आरसा ह्याचा अर्थ तुलसीदास सांगतात की, सद्‌गुरुचरणांच्या धुळीने माझ्या मनरुपी आरश्याला मी स्वच्छ करतो. जेव्हा ह्र्दयात सद्‌गुरुंचे चरण असतील तर मनाचा आरसा कितीही मलीन असला तरी तो स्वच्छ होतोच. अशी ही हनुमान चलिसा ह्या महिन्यात एकदा तरी १०८ वेळा म्हणा. ५ तास लागतात. समजा १०८ च्या ऎवजी ६१ वेळाच झाले तरी त्याचा कमी फायदा आहे का? ह्या महिन्यात जप करण्यासाठी counting करुच नका. जे काही म्हणता येईल ते म्हणा. ॐ कृपासिंधु म्हणा, ॐ  मनसामर्थ्यदाता..  म्हणा जे  काहीही तुम्हाला आवडेल तो जप म्हणा पण म्हणा. खुप सुंदर हा  महिना आहे. अर्धा जेष्ठ आणि अर्धा आषाढ असा हा महिना आहे. ह्याला काय नाव देता येईल आपल्याला. आज ह्या महिन्याला नाव ठेवुया. काय नाव ठेवता येईल? नाही सुचत? आत्ताच सांगितले ना मी.. "श्रीगुरु चरनरज सरोज रज..." तर हा महिना म्हणजे  गुरुचरण महिना. ह्या महिन्यात अतिशय प्रेमाने हनुमंताचे नाव घ्यायचे का?  तर श्री गुरुंचे चरण प्राप्त व्हावेत म्हणून, ..हनुमंताशी तुट्लेले connection जोडले जावे म्हणुन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो त्याच्या सगळ्या लेकरांवर अतीव प्रेम करतो म्हणुन.
तुमच्यावर जे कोणी प्रेम करतात त्याला १ लाख कोटीने गुणले ना तरी होणार नाही एवढे प्रेम 
सद्‌गुरुंनी तुमच्यावर एका मिनिटाला केलेले असते जे सगळ्यांपेक्षा भारी असते. 
म्हणून सांगतो  तुम्ही कुणालाही सद्‌गुरु माना पण माना कारण त्याशिवाय पर्याय नाही. फक्त दाढीवाल्या बुवांच्या मागे लागु नका. डोक शाबुत ठेऊन भक्ती करा. हा गुरुचरण महिना कसा आहे तर हनुमंताशी connection  जोडणारा. एक लक्षात ठेवा, राम हनुमंताकडे गेला की हनुमंत रामाकडे? राम हनुमंताकडे गेला, रामाचे हनुमंतावर नितांत प्रेम होते. 
तुलसीदासासारखा श्रेष्ठ भक्त प्रथम काय लिहितो तर 
"बुद्धीहीन तनु जानिके सुमिरॊ पवन कुमार.."
मनुष्य बुद्धीहीन आहे, म्हणुन योग्य मार्गाने प्रवास घडण्यासाठी हनुमान चलिसा म्हणा. आज जे काही आपण त्रिविक्रमाचे knowledge घेतले ते लक्षात ठेवुन त्या त्रिविक्रमाकडे " दया कर, कृपा कर, क्षमा कर" हे मागणं मागितलंत तर तो त्रिविक्रम त्याची तीन पावले तुमच्या दिशेने नक्कीच चालेल , ह्याची अनंत पटीने मी तुम्हांला guarantee देतो. 
 
हरी ॐ

Saturday, June 18, 2011

गुरुपौर्णिमा उत्सव २०११

हरी ओम,
दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. ह्या वर्षी हा उत्सव श्री हरीगुरुग्राम येथे दिनांक १६ जुलै २०११ रोजी साजरा होणार आहे. 
ह्या वर्षी पासून ह्या उत्सवात होणारे काही बदल सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंनी सांगितले आहेत ते पुढीलप्रमाण:-
  1.  ह्या वर्षी उत्सवाची सुरुवात बापू , नंदाई व सूचितदादा श्री नृसिंह सरस्वतींचे पादुका पूजन करून करणार आहेत. हे पूजन चालू असताना गुरुगीतेची सीडी लावण्यात येणार आहे. नंतर ह्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार.
  2. नेहमी प्रमाणे "साईराम जप " जिथे चालतो त्या ठिकाणी चौकोनी स्तंभ नसून तो त्रिकोणी असणार आहे आणि त्या स्तंभावर बापू, नंदाई आणि सूचितदादा ह्यांच्या प्रतिमा असतील. त्या स्तंभावर कमळ असून त्यात बापूंच्या सदगुरुंच्या पादुका असणार आहेत त्या बंधिस्त असतील त्याचं दर्शन कोणाला घेता येणार नाही. आणि पुर्वावधुत व अपुर्वावधुत असे २ अवधूत कुंभ असतील. ह्या स्तंभाला प्रत्येकाला प्रदक्षिणा घालता येणार आहे.
  3. ह्या वर्षी पासून श्री त्रिविक्रमाचे पूजन सर्वांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी करता येणार आहे. हे पूजन २ प्रकारचे असणार आहे ज्याचे देणगी मूल्य रुपये ५०१/- व रुपये १००१/- असे असणार आहे ज्याला जे जमेल ते पूजन श्रद्धावान करू शकतो
  4.  ह्या वर्षी पासून दिंडी सोबत पालखी मध्ये श्री सदगुरू अनिरुद्ध बापूंची पदचिन्हे असणार आहेत आणि अभिषेक जलाचा गडू ठेवण्यात येणार आहे. तसेच हि दिंडी भाक्तीगन्गेतून फिरणार आहे. आणि प्रत्येक भक्ताला डोक ठेवून दर्शनाचा लाभ मिळणार आहे.





Wednesday, June 15, 2011

A.A.D.M. मान्सून सेवा एक सुखद अनुभव- (by Saiprasadsinh Malvankar)


काल जोरात पाउस पडला आणि बरोबर एका वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला.
       असाच मुसळधार पाउस पडला होता,हिंदमाता,परेल इथे नेहमीप्रमाणे गुडघ्याच्यावरपर्यंत पाणी साचले होते.आणि ऑफिस सुटून सर्व लोक परतण्याची संध्याकाळची वेळ होती. B.M.C. कडून आपल्या  A.A.D.M. ला सेवेसाठी कॉल आला.आणि आम्ही  D.M.V.s लगेच त्या ठिकाणी पोहोचलो.आपले काही  D.M.V.s वाहतूक पोलिसांबरोबर ट्राफिक कंट्रोल करीत होते.आम्ही परेल ब्रिजखाली स्टेशनमधून बाहेर पडणारया लोकाना मदत करत होतो.Rope च्या मदतीने त्यांना पाण्यामध्ये चालण्यासाठी मार्गदर्शन करत होतो.त्यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध अशी सर्व प्रकारची लोक होती.

     अचानक माझ लक्ष एका पारशी आजींकडे गेल.७०-७५ वय असेल त्याचं. .एका हातात पिशवी.....दुसऱ्या हातात छत्री.....कमरेपर्यंत पाणी........आजूबाजूला लोक होती,पण प्रत्येकजण आपापल्या घाईत,,,,आणि जरी त्यांनी मदत केली तरी त्यांना घरापर्यंत सोडेल का?त्यामुळे मीच त्यांच्याकडे गेलो.म्हणालो -आप मत घबरायीये,,,,मै आपके साथ आता हू,,,,, त्यावेळी जी चमक त्यांच्या डोळ्यात आली....जो विश्वास त्यांना वाटला न....तो क्षण आजही आठवतो मला.मग त्यांची पिशवी आणि छत्री  घेतली आणि एका हाताने त्यांचा हात धरला...तर खूप थरथरत होता,,,कमरेपर्यंत पाणी असल्यामुळे त्यांना धड चालताही येत नव्हत.त्यात त्यांच्या पायातील दोनही चपला वाहून गेल्या.  तरी पण आपल्याबरोबर कोणीतरी आहे या विश्वासाने त्याही चालत होत्या. जो रस्ता चालायला फक्त ३ मिनिट लागतात त्यासाठी आम्हाला अर्धा तास लागला.पण त्या अर्ध्या तासात जे काही झाल न ते खरच खूप वेगळच होत,,,,,,,
             त्या आजी स्वतःच सांगू लागल्या - सच्ची बेटा,,,,इस दुनिया मै कोई किसीका नही होता,,,,,,,रिश्तेदार है पर कोई काम के नही,,,,,,अपना यहां पे बडा घर है पर सिर्फ मै अकेली रेहती हू,,,,,,,बेटा...तुम लोग ये काम कर रहे हो न.....सच्ची मै बहोत अच्छा काम है,,,,,,,पर इसका आपको क्या मिलता है ?
      खरच त्यांनी केलेल्या प्रश्नातच त्याच उत्तर होत.मनामध्ये खूप blessed वाटत होत.जे माझ मन फक्त स्वतःचाच विचार नेहमी करत.त्या मनाला आज इतरांसाठी काही करायची सवय कशी लागली?नाहीतर आज इतर लोकांप्रमाणे मी ही कदाचित स्वत:चा विचार करून घरी गेलो असतो.आरामात पावसाचा आनंद लुटत असलो असतो.मग आता मला अस नक्की काय मिळतंय?
      आणि मग उत्तर सापडलं मला खूप आनंद मिळतोय,,,,,,कारण मला माझा बापू त्यातून मिळतोय......तो आपल्यासाठी प्रत्येक संकटात धावून येतच असतो......पण देणारयाने देत जावे/ घेणारयाने घेत जावे / परी घेणारयाने देनारयाचे एकदा तरी हात घ्यावे //  याप्रमाणे मी करतो का?

     मग त्यांना बापुंबद्दल सगळी माहिती सांगितली आणि  A.A.D.M.बद्दलही सांगितले.आणि त्यात त्याचं घरही आल.तर त्या म्हणाल्या - बेटा,अभी मेरे घर चलना....और चाय-पानी पिके जाना/ मी म्हणालो - नही मुझे जाना होगा,,,आपके जैसे और भी लोग होंगे उनकी भी मदद करनी है न,,,,,, पण नाही या   हात सोडायला तयारच नाहीत,,,,म्हणाल्या - बेटा....अभी जाना मत खाना खाने को जरूर आना....

      आणि मग मी तिथून निघालो,,,त्याही घराच्या पायरया हळू हळू चढत होत्या.अगदी तासभरापुर्वीचीच  आमची ओळख.....पण का माहित नाही,,,,,,खूप heart touching अनुभव होता.वाटत होत कि येस...समाजाशी पण आपली काही बांधिलकी आहे.असे अनेक जण आहेत,,,ज्याना आपण सहज मदत करू शकतो.

       त्या निघताना एकच वाक्य बोलल्या - बेटा,,,,जो कोई भी तुम लोगोसे ये काम करावा के ले रहा है न ....भगवान का काम है,,,,,,,,God Bless You!!!.मनात खूप आनंद वाटत होता कारण आपल्या मनात सेवा करण्याची इच्छा उत्पन्न करणारही तोच......आपल्याकडून सेवा करवून घेणारही तोच.....आणि सेवा झाल्यावर blessings देणाराही तोच.........श्री राम!!!

 - By Saiprasadsinh Malvankar

Tuesday, June 14, 2011

सदगुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (०९-०६-२०११)

हरी ॐ 
 
विष्णूसहस्त्र नामामध्ये "ॐ मंत्राय नम:" ह्या नावाचा अभ्यास करताना आपण बीजमंत्र बघितले.पुढे प्रवास करत करत आपण श्री गुरुक्षेत्रम मंत्रावर स्थिर झालो . 
 
ह्यात सर्व बाधाप्रशमनं मध्ये आपण बाधा बघितल्या किती बाधा बघितल्या? कुणाला नाही आठवत. म्हणजे पुढचे पाठ मागचे सपाट.
आतापर्यंत एकुण ८ बाधा झाल्या आणि एकूण किती बघायच्या होत्या तर ११. तर ९, १०, ११ ह्या तीन बाधा बघायच्या आहेत. आज जी ९ वी बाधा बघायची आहे ती अतिशय महत्वाची आहे, जी मनुष्याच्या जीवनात ठायी ठायी जाणवते. 
 बर्‍याच वेळा मनुष्याच्या जीवनात करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे घडत असते. आमच्या हाताच्या रेषाच उलट्याच. आमच्या मीठाला चवच नाही. प्रत्येकाने अशी वाक्ये किती वेळा ऐकली असतील. म्हणजे intention  एक आहे, कृती  चांगली आहे पण response वेगळाच होतो . 
 
आपण ठरवतो रात्री लवकर झोपायचे व सकाळी लवकर उठायचे, पण घडते का? नाही झोपायला नेमके तेव्हाच १२-१ वाजतात आणि मग उठायला दुपार होते. जर आपण ठरवले की आता ह्याच्यापुढे अजिबात चिडायचे नाही तेव्हा लगेच पुढच्या ५ व्या मिनीटाला चिडचिड सुरु होते. असं का होते? 
 
दरवर्षी पहिल्या दिवशी ठरवले जाते बापुंनी सांगितलेली एक उपासना रोज अमुक वेळा करायची. पहिल्या दिवशी उपासना नीट होते, दुसर्‍या दिवशी ठीक होते, तिसर्‍या दिवशी सकाळी अर्धी,संध्याकाळी अर्धी होते. मग फक्त संध्याकाळीच अर्धी होते, पुढे एक दिवसाआड व हळुहळु पूर्ण बंद होते. 
 
जेव्हा अपचनाचा त्रास झाल्यावर डॉक्टर कडॆ आपण जातो. अनेकदा डॉक्टर ने अन्न चावुन खाण्यास सांगितलेले असते पण आपण तसे वागतो का? बरीच माणसे तोंड सतत बंद ठेवतात त्यांच्या तोंडाला वास येतो ह्यामागे scientific reson आहे, ह्याला ४ गोष्टी कारणीभूत असतात. ब्रश  नीट न केल्याने फक्त १०% तर
१) मुख्य म्हणजे कोठा साफ नसला तर तोंडाला वास येतो . 
२) मनुष्याच्या लाळेत अनेक bacteria  असतात त्यामुळे जर सतत तोंड बंद असेल तर अतिशय घाणेरडा वास येतो. 
३) तोंड व गुदद्वार ह्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, जेव्हा डॉक्टर गुद्द्वाराची तपासणी करतो तेव्हा तोंड उघडुन लांब लांब श्वास घेण्यास सांगतो. कारण त्यामुळे अन्ननलिका व गुदद्वार ह्यांची आकुंचन- प्रसरणाची क्रिया होत असते ज्यामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते.
४) जेवणानंतर जर नीट चुळ भरली नाही, ब्रश केला नाही  तर जे अन्न दातात अडकलेले असते ते तसेच राहिल्याने कुजते आणि असंख्य bacterias तयार होतात त्यामुळे मग घाणेरडा वास येत राहतो . 

त्यामुळे गप्प गप्प राहण्यापेक्षा मिळूनमिसळून राहा, आनंदी राहा, गप्पा, विनोदात सहभागी व्हा.
इथे किती जण ३२ वेळा चावुन खातात? कोणी सांगितल्यावर १ दिवस खातील परत मग नेहमी सारखे घाईघाईत खाणे सुरु होते. जास्तीत जास्त आपण सात ते आठ वेळा घास चावतो. काही जण तर घास चावण्याच्या फंदातच पडत नाहीत गिळूनच टाकतात.
कधी वजन कमी करायचे ठरवले की नेमकी तेव्हाच जास्त भुक लागते. कोणाला वजन वाढवायचे असेल तर भूकच लागत नाही. असे का नेहमी घडत असते ? 
 
आपण ग्रंथराज मध्ये बघितले की प्रत्येक मनुष्याच्या देहात ४ केंद्र असतात आहार, मैथुन, निद्रा व भय. अशीच ४ केंद्रे प्रत्येकाच्या मेंदुतही असतात ती म्हणजे -
१) Reward center ( बक्षिस केंद्र ) 
2) Punishment center ( शिक्षा केंद्र )
3) Pleasure center ( सुखाचे केंद्र ) 
4) Displeasure center ( दु:खाचे केंद्र ) 
ह्या ४ केंद्रांच्या माध्यमातुनच मनुष्याचे  मन घडत असते.  मनुष्याच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही ह्या ४ केद्रांशी संबधित असते. आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेचा ही केंद्रे अभ्यास करतात व त्यानुसार त्यांची व्याप्ती ठरत असते. इथे हा अभ्यास कशाच्या आधारे केला जातो हे महत्त्वाचे आहे.
 
उदाहरणार्थ आई बाबांनी सांगितलेली गोष्ट ही मुलांना pleasure वाटते की, displeasure  ह्यावर त्याची व्याप्ती ठरते. जेव्हा मनुष्य अनुचित गोष्टीला displeasure  व उचित गोष्टीला pleasure  समजतो तेव्हा त्याचे मन समर्थ बनते. 
मुलांचे मन काय ठरवत असते? तर ते pleasure गोष्टीला displeasure समजते. आई वडिलांनी काय शिकवले हे नक्कीच महत्वाचे असते परंतु मनुष्य हा स्वत: काय निर्णय घेतो हे अतिशय महत्वाचे असते. जेव्हा मन शिस्तीला  displeasure समजते तेव्हा ते मनुष्याचे जीवन बेशिस्त, अनुशासनहिन बनवते. 
आपण शाळेते एक law  शिकतो, की जर एका बंदिस्त द्रव पदार्थाला pressure  दिले तर ते सर्व बाजुने समानपणे पसरते, कुठला law आहे हा? कुणाला नाही आठवत? ह्याला Pascal's law  म्हणतात. 
 
आपला मेंदु solid, liquid व gases  ह्याने बनलेला आहे. आपलं मन, भावविश्व हे fluid प्रमाणे आहे 
Pascal's law प्रमाणे जसा द्रव पदार्थ pressure दिल्यामुळे सर्वत्र पसरतो तसेच आपल्या मनावर जे जे संस्कार होत असतात ते सर्व मन भर पसरतात. आपण जर बेशिस्त वागत राहिलो तर आपल्या मनातही तिच अनुशासनहिनता पसरते. 
म्हणून जीवनात आनंदी राहाण्यासाठी, आनंद येण्यासाठी आनंदी वृत्ती  असणे आवश्यक असते. आनंदाचे डोही आनंद तरंग तर जे लोक नेहमी किरकिर करतात, नेहमी दु:खी असतात त्यांच्या जीवनात सुद्धा मग कायम दुख:च राहते.
 
कामावरुन नवरा घरी आल्यावर बायकोने, मुलांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याची चिडचिड करायची सवय असते. त्यामुळे तो कधी बायकोचे कौतुक करु शकत नाही, किंवा मुलांना प्रेमाने विचारु शकत नाही. अश्या मनुष्याच्या जीवनात आनंदाचे तरंग कधी उठूच शकणार नाहीत, त्याच्या जीवनात नेहमी दु:खच राहणार. ही बाधाच अशी आहे, ह्याला अतिशय सुंदर नाव आपल्या प्राचीन आचार्यांनी दिले आहे, जे अतिशय समर्पक आहे ते म्हणजे स्वमन बाधा.
 स्वमन बाधा म्हणजेच स्वत:च्या मनाने स्वत:लाच केलीली बाधा. तुमच्या मनाला तुम्ही लावलेले वळण तुमच्या आड येत असते. आपल्याला हिंदी पिक्चरचे गाणे किती लवकर पाठ होते पण शाळेतील एखादी कविता पाठ व्हायची का? नाही. हे असे का घडते तर आपल्या मनाचे वळण तसे असते म्हणुन. तुम्ही म्हणाल आम्ही चांगले वागलो तरी लोक आमच्याशी वाईट वागतात हे कसे काय?
 
तर हे सुद्धा आपल्या मनामुळेच घडत असते. आपल्या प्रत्येकाच्या देहाभोवती एक aura (प्रभामंडल) असतो जो दिसत नाही. तुमच्याशी संबंधित व्यक्ती जे जे काही वागते ते ते सर्व modified  करायचे काम तुमचा aura  करत असते. 
समजा तुम्हांला एखाद्या व्यक्तीला मारायचे आहे व तुमचा aura  चांगला आहे तर तेव्हा काय घडते की, ती व्यक्ती आपोआप कुठेतरी पाय घसरुन आपटते किंवा पडते व तिला भरपुर मार लागतो.
एक उदाहरण इथे सांगतो, ७-८ वर्षापुर्वी माझ्याकडे एक जोडपे आले होते, दोघेही स्वभावाने चांगले पण बायको लग्नानंतर काही महिन्यांनी सतत गप्पगप्प रहायला लागली. तिला प्रचंड acidity चा त्रास होत होता.  मी (प.पु.बापू)  घरातले वातावरण कसे आहे हे विचारल्यावर कळले की, त्या घरात ३ नणंदा, सासु, आत्या मिळुन एकूण ८ बायका होत्या. त्या सगळ्या ह्या नवीन नवरीला सतत टोमणे मारु लागल्या. तिच्या मनाला ही गोष्ट लागत राहीली. मी (प.पु.बापू) तिला सांगितले आता त्या काहीही बोलल्या तर आनंद व्यक्त कर, त्यांना टाळी दे. तिने तसे वागायला सुरुवात केल्यावर १-१/२ महिन्यात एक नणंद वेडी झाली, दुसरी नणंद लग्न करुन पळुन गेली तर तिसरीने तिच्याशी जुळवुन घेतले. कारण हिने प्रत्येक गोष्टीत आनंद व्यक्त केल्यावर घरातल्या बाकीच्या बायकांना हिला त्रास दिल्याचा आनंद मिळणे बंद झाले. म्हणजे जीवनात आनंद आणणे ही गोष्ट पुर्णपणे त्या नवीन नवरीच्या मनावर अवलंबुन होती. 
 
कोणी कितीही त्रास दिला तरी मी त्रास करुन घ्यायचा की नाही हे माझ्या मनावर अवलंबुन असते. तुमचा aura  बळकट असेल तर तुमच्याशी माणसे कृतज्ञच वागतात.ते कृतघ्न वागु शकत नाहीत.तेच जर aura   कमकुवत असेल तर मग कितीही आपण चांगले वागलो तरी आपल्याला वाईट अनुभव येतात. 
असे का घडते? तर जर माझे प्रभामंडल weak असेल तर माझ्या मेंदुतील चार केंद्रेही weak होतात. जर ही चार केंद्रे बळकट करण्याचा प्रयत्न केला तर आपण ही स्वमन बाधा टाळु शकतो . 
जर तुमच्या मनाला पटले की आपण चुकीच्या मार्गाने pleasure  मिळवतो आहोत, की आपोआप तुमचे मन मग चांगल्या मार्गाने pleasure मिळवण्याचे काम करु लागते . 
 
जर मी (प.पु.बापू) म्हटलेले लाथ घालीन कंबरड्यात हे जर समोरच्या व्यक्तीला pleaure वाटले तर त्याचे pleasure centre वाढेल पण तीच जर समोरच्या व्यक्तीला शिक्षा वाटली तर त्याचे  punishment centre वाढेल . 
जो मनुष्य प्रत्येक सजा / अडचण ही सुधारण्याची संधी समजतो त्याचे pleasure centre  वाढत जाते. आणि  pleasure centre  वाढणे म्हणजे मनुष्याकडुन चुक न होणे. ज्याचे  pleasure व reward centre मोठे त्याच्यावर कोणी अन्याय करु शकत नाही, त्याच्या आयुष्यात  कधी दु;ख येऊ शकत नाही.
म्हणुन ही pleasure व reward ही दोन केंद्रे वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ह्यासाठी लहान-सहान गोष्टीतही आनंद साजरा करण्याची सवय करा. 
 
कोणी विरोध केला तर आनंद माना, चार माणसे भेटली तर गप्पा मारा, जी माणसे कोणी भेटले तर नुसती गप्प राहतात त्यांचे  displeasure centre वाढते. म्हणून स्वत:च्या तसेच दुसर्‍याच्याही छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीत आनंद मानायला शिका. 
काही दिवसापुर्वी एक पिक्चर घरी बघितला, घरातल्या सर्व स्त्री वर्गाने त्या पिक्चरला नावे ठेवली कारण त्या पिक्चरमध्ये कशाचा कशाला संबंध नव्हता की त्याला काहीही story  नव्हती. तरी मला तो पिक्चर अतिशय आवडला. पिक्चरमध्ये काहीही घडले तरी आपल्याला काही त्याचा फरक पडतो का? नाही. पिक्चर कितीही बेकार असला तरी तो परिवारासोबत एकत्र बघताना आनंद व्यक्त करता आला पाहिजे.
बरेच जण मी बघतो राणीच्या बागेत गेल्यावर किती घाण वास येतो म्हणतात, आता तिथे जनावरे आहेत म्हणजे वास येणारच. त्या खराब वासामुळे चि्डचिड करत तुम्ही तुमचा का आनंद घालवता?
जर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानला नाही तर pleasure centre  वाढणार कसे? 
बायकोला  नवर्‍याने आणलेल्या साडीपेक्षा जावेची साडी जास्त आवडते, अशी तुलना करत राहिल्यावर pleasure centre  कसे वाढू शकेल?
 
एक मध्यमवयीन जोडपे मला सांगत होते आमची आई पटकन गेली पण तीच जेव्हा त्यांचे म्हातारे वडील १ -१/२ महिना बिछान्याला खिळले  तेव्हा ह्याच जोडप्याला मनात विचार असायचा की अजुन किती दिवस राहणार? 
म्हणजे माणसाला नक्की काय हवे आहे?
अश्या वृत्ती मुळे आमची ही  pleasure व reward ही दोन केंद्रे वाढु शकत नाहीत. ह्यासाठी आमची सुखाची वृत्ती व शिस्त वाढवली पाहिजे. व चांगल्या गोष्टींना शिक्षा मानणे ही वृत्ती व दु:खाची वृत्ती कमी केली पाहिजे.
आणि ह्यासाठी लागणारी ताकद येते कुठुन तर गुरुमंत्रातुन. आपल्या सगळ्यांचा एकच गुरुमंत्र तो म्हणजे गुरुक्षेत्रम मंत्र. तुमच्या aura मध्ये हस्तक्षेप करण्याचा, तुमचे प्रभामंडल बदलण्याचा अधिकार फक्त गुरुक्षेत्रममंत्रालच आहे. 
 
आनंदी वृत्ती वाढवायची असेल तर सद्‌गुरुला शरण जा. गुरुची आज्ञा पाळायला शिका. गुरुने लाथ घातली शिवी घातली तर त्याचा ज्याला आनंद वाटतो, गुरुची शिवी हा अशिर्वादच आहे अशी ज्याची खात्री असते त्याचेच pleasure centre वाढते जाते. 
बापु ओरडले तर राग येणारच असे किती जणांना वाटते (सगळे नाही म्हणतात). अरे हो म्हणा काही जणांचे हो तर काही जणांचे नाही ऐकु आले, दोघांच्या भावना योग्यच आहेत, त्यामुळे हो आणि नाही म्हणणार्‍या सगळ्यांना  " I Love You " . बापु ओरडले म्हणुन दु:ख नको तर मी चुकलो म्हणुन बापु ओरडले ही जेव्हा जाणीव असेल तेव्हा  pleasure centre वाढत जाईल. 
 
आपल्या मेंदुतील ह्या चार केंद्रातील स्वमन बाधा दुर करण्याची क्षमता ह्या गुरुमंत्रामध्ये आहे . 
" एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा " 
" सर्वबाधा प्रशमनं श्री गुरुक्षेत्रम" स्वमन बाधा ही जन्मापासुन मृत्युपर्यंत जीवनाला व्यापुन उरणारी बाधा आहे. जे करायचे असते नेमके त्याच्या उलटेच होत असते. ही बाधा टळण्यासाठी नित्य स्वत: जागृत राहुन गुरुच्या चरणांशी शरणागत राहायला हवे. 
एक गोष्ट इथे आठवते स्वामींनी (स्वामी समर्थ) माझ्या (प.पु.बापू) खापर पणजोबांना एका शारीरिक व्याधीसाठी हत्तीची विष्ठा लावायला सांगितली त्यांनी पुर्ण विश्वास ठेवुन ती नियमित लावली व त्यामुळे अनेक औषधांनी सुद्धा बरे न झालेले दुखणे कायमचे बरे झाले. ह्यावरुन लक्षात येईल की गुरुच्या शब्दांची काय ताकद असते. जेव्हा गुरुवर संपुर्णपणे विश्वास असतो तेव्हाच गुरुची कृपा प्राप्त होत असते, गुरुवर जर विश्वास नसेल तर गुरुचे सामर्थ्य, त्यांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही.  आज आपण स्वमन बाधा शिकलो.
गुरुचा शब्द, गुरुचे चरण, व गुरुने दिलेला मंत्र ह्या तीनही गोष्टी जर घट्ट आयुष्यात धरुन ठेवल्या तर प्राण जाण्याची कधी वेळ येणार नाही, मुख्य म्हणजे प्राण जाणारच नाही. कारण ह्या तिन्ही गोष्टींपुढे यमाचीही ताकत चालत नाही. मग स्वमन बाधा तर त्याच्यापुढे खुपच छोटी आहे. 
हरी ॐ