Wednesday, June 15, 2011

A.A.D.M. मान्सून सेवा एक सुखद अनुभव- (by Saiprasadsinh Malvankar)


काल जोरात पाउस पडला आणि बरोबर एका वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला.
       असाच मुसळधार पाउस पडला होता,हिंदमाता,परेल इथे नेहमीप्रमाणे गुडघ्याच्यावरपर्यंत पाणी साचले होते.आणि ऑफिस सुटून सर्व लोक परतण्याची संध्याकाळची वेळ होती. B.M.C. कडून आपल्या  A.A.D.M. ला सेवेसाठी कॉल आला.आणि आम्ही  D.M.V.s लगेच त्या ठिकाणी पोहोचलो.आपले काही  D.M.V.s वाहतूक पोलिसांबरोबर ट्राफिक कंट्रोल करीत होते.आम्ही परेल ब्रिजखाली स्टेशनमधून बाहेर पडणारया लोकाना मदत करत होतो.Rope च्या मदतीने त्यांना पाण्यामध्ये चालण्यासाठी मार्गदर्शन करत होतो.त्यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध अशी सर्व प्रकारची लोक होती.

     अचानक माझ लक्ष एका पारशी आजींकडे गेल.७०-७५ वय असेल त्याचं. .एका हातात पिशवी.....दुसऱ्या हातात छत्री.....कमरेपर्यंत पाणी........आजूबाजूला लोक होती,पण प्रत्येकजण आपापल्या घाईत,,,,आणि जरी त्यांनी मदत केली तरी त्यांना घरापर्यंत सोडेल का?त्यामुळे मीच त्यांच्याकडे गेलो.म्हणालो -आप मत घबरायीये,,,,मै आपके साथ आता हू,,,,, त्यावेळी जी चमक त्यांच्या डोळ्यात आली....जो विश्वास त्यांना वाटला न....तो क्षण आजही आठवतो मला.मग त्यांची पिशवी आणि छत्री  घेतली आणि एका हाताने त्यांचा हात धरला...तर खूप थरथरत होता,,,कमरेपर्यंत पाणी असल्यामुळे त्यांना धड चालताही येत नव्हत.त्यात त्यांच्या पायातील दोनही चपला वाहून गेल्या.  तरी पण आपल्याबरोबर कोणीतरी आहे या विश्वासाने त्याही चालत होत्या. जो रस्ता चालायला फक्त ३ मिनिट लागतात त्यासाठी आम्हाला अर्धा तास लागला.पण त्या अर्ध्या तासात जे काही झाल न ते खरच खूप वेगळच होत,,,,,,,
             त्या आजी स्वतःच सांगू लागल्या - सच्ची बेटा,,,,इस दुनिया मै कोई किसीका नही होता,,,,,,,रिश्तेदार है पर कोई काम के नही,,,,,,अपना यहां पे बडा घर है पर सिर्फ मै अकेली रेहती हू,,,,,,,बेटा...तुम लोग ये काम कर रहे हो न.....सच्ची मै बहोत अच्छा काम है,,,,,,,पर इसका आपको क्या मिलता है ?
      खरच त्यांनी केलेल्या प्रश्नातच त्याच उत्तर होत.मनामध्ये खूप blessed वाटत होत.जे माझ मन फक्त स्वतःचाच विचार नेहमी करत.त्या मनाला आज इतरांसाठी काही करायची सवय कशी लागली?नाहीतर आज इतर लोकांप्रमाणे मी ही कदाचित स्वत:चा विचार करून घरी गेलो असतो.आरामात पावसाचा आनंद लुटत असलो असतो.मग आता मला अस नक्की काय मिळतंय?
      आणि मग उत्तर सापडलं मला खूप आनंद मिळतोय,,,,,,कारण मला माझा बापू त्यातून मिळतोय......तो आपल्यासाठी प्रत्येक संकटात धावून येतच असतो......पण देणारयाने देत जावे/ घेणारयाने घेत जावे / परी घेणारयाने देनारयाचे एकदा तरी हात घ्यावे //  याप्रमाणे मी करतो का?

     मग त्यांना बापुंबद्दल सगळी माहिती सांगितली आणि  A.A.D.M.बद्दलही सांगितले.आणि त्यात त्याचं घरही आल.तर त्या म्हणाल्या - बेटा,अभी मेरे घर चलना....और चाय-पानी पिके जाना/ मी म्हणालो - नही मुझे जाना होगा,,,आपके जैसे और भी लोग होंगे उनकी भी मदद करनी है न,,,,,, पण नाही या   हात सोडायला तयारच नाहीत,,,,म्हणाल्या - बेटा....अभी जाना मत खाना खाने को जरूर आना....

      आणि मग मी तिथून निघालो,,,त्याही घराच्या पायरया हळू हळू चढत होत्या.अगदी तासभरापुर्वीचीच  आमची ओळख.....पण का माहित नाही,,,,,,खूप heart touching अनुभव होता.वाटत होत कि येस...समाजाशी पण आपली काही बांधिलकी आहे.असे अनेक जण आहेत,,,ज्याना आपण सहज मदत करू शकतो.

       त्या निघताना एकच वाक्य बोलल्या - बेटा,,,,जो कोई भी तुम लोगोसे ये काम करावा के ले रहा है न ....भगवान का काम है,,,,,,,,God Bless You!!!.मनात खूप आनंद वाटत होता कारण आपल्या मनात सेवा करण्याची इच्छा उत्पन्न करणारही तोच......आपल्याकडून सेवा करवून घेणारही तोच.....आणि सेवा झाल्यावर blessings देणाराही तोच.........श्री राम!!!

 - By Saiprasadsinh Malvankar

No comments:

Post a Comment